ठाणे पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

ठाणे | राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेसाठी विनापरवानगी पोस्टर्स लावल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांची डोकेदुखी वाढलीय. कारण ठाणे पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणखी एक गुन्हा दाखल केलाय. 

मनसेचे नेते अभिजित पानसे, राजू पाटील आणि ठाणे मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह 7 कार्यकर्त्यांवर हे गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळे ठाणे पोलीस आणि मनसेतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, याआधी ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यात जामिनासाठी एक कोटी रुपयांची रक्कम ठेवल्याने मनसे आणि ठाणे पोलीस आमने-सामने आले होते. मात्र पोलिसांनी नमती भूमिका घेत ती रक्कम 1 लाख रुपयांवर आणली होती.