‘आता नंबर बापटांचा का?’, पुण्यातील ‘त्या’ बॅनरमुळे चर्चांना उधाण
मुंबई | कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने (Bjp) उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजप नेते हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर मोठी नाराजी उफळल्याचं चित्र आहे. यावर मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे पती शैलेश टिळक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते भावूक झाले होते.
मुक्ता टिळक यांनी कायम जनतेच्या हिताची कामं केली. आजारपणातही त्यांनी काम केलं. त्यांनी जे काम केलं त्यावर अन्याय झाला, अशी प्रतिक्रिया शैलेश टिळक यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं पाहायला मिळालं.
घरातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी केली होती. मात्र पक्षाने वेगळा निर्णय घेतलाय तो आम्हाला मान्य आहे. आम्ही वेगळा काही विचार करणार नाही, असं शैलेश टिळक यांनी सांगितलं आहे. अशात मुक्ता टिळक यांच्या मतदारसंघात म्हणजेच कसब्यात देखील भाजपविरोधातील नाराजी उफाळून आल्याचं दिसत आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आज हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वीच कसब्यात ‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का?, असा सवाल करण्यात आलाय.
समाज कुठवर सहन करणार?, अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले आहेत. या बॅनरवर कोणाचंही नाव नसून कसब्यातील एक जागरूक मतदार इतकंच यावर लिहण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.