Top News महाराष्ट्र मुंबई

‘तो’ निर्णय माझा व्यक्तिगत नव्हता, सरकारचा होता- नितीन राऊत

मुंबई | विज ग्राहकांना बील माफी देण्यासाठी आजही विचारविनिमय सुरु आहे. विजबीलमाफी माझं व्यक्तिगत मत नव्हतच, तो सरकारचा निर्णय होता, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं.

एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महाराष्ट्राबद्दलच त्यांच व्हिजन स्पष्ट केलं. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, “वीजबिल माफी हे केवळ एका खात्याचं नाही. हे सरकारचं काम आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एमईआरसीला प्रस्ताव दिला. वाढीव वीज बिल माफी करु अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर केली होती.”

तसेच, ऊर्जा खातं वीज पुरवठा आणि वीज निर्मितीसाठी कर्ज काढतं. वीजबिलमाफीसाठी कर्ज घेत नाही. राज्य सरकार कधीही वीज बिल माफी करु शकतं. विरोधी पक्षानं केंद्राच्या विरोधी आंदोलन करावं. राज्य सरकारचा हक्काचा पैसा मागण्यासाठी त्यांनी राज्याची बाजू घ्यावी, असंही नितीन राऊत म्हणाले.

थोजक्यात बातम्या-

“आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस अन् गोड चहा घेणं सोडा”

देशांतर्गत वापरासाठी पुण्याहून सिरमच्या कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच रवाना

नितेश राणे हे पहिले हँग ते चाराण्यासारख्या गोष्टी करतात- अब्दुल सत्तार

वरुण द्या, खालून द्या…, मनात असेल त्यांना सुरक्षा द्या- देवेंद्र फडणवीस

थोरली CA तर धाकटी UPSC उत्तीर्ण, भाजप खासदार ओम बिर्ला यांचं शिक्षण किती?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या