मुबंई | विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे गट व भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला. बहुमत चाचणीनंतर अधिकृतरीत्या भाजप (BJP) आणि शिंदे गट सत्तेत आला. शिंदे सरकारने बहुमतापेक्षा जास्त मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत देखील भाजप विजयी ठरलं.
बहुमत चाचणीनंतर उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अभिनंदनपर भाषण केलं.यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं भरभरून कौतुक केलं. यापुढे नेता वेळ देत नाही अशी तक्रार येणार नाही. एकनाथ शिंदे सगळ्यांना भेटतील असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे हे 24 तास काम करणारे मंत्री आहेत. माझे आणि त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. बाळाासाहेबांचे विचार त्यांनीच पुढे नेले आहेत असंही फडणवीस म्हणाले.
शिवसेना जेव्हा प्रताप सरनाईक उभे राहिले तेव्हा ईडी-ईडी असं ओरडत होते. हे सगळे आमदार ईडीच्या भीतीने आले अशी टिका करत आहेत. ही ईडी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून एकनाथ आणि देवेंद्र आहेत. ज्यांच्यासाठी हे आमदार आले आहेत, असं स्पष्ट वक्तव्य केलं. यानंतर सभागृहात सगळ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
दरम्यान, 2019 वेळी मी पराभूत झालो होतो. यावेळी ‘मी पुन्हा येईन’ असं वक्तव्य केलं होत. माझ्या त्या वक्तव्याची प्रचंड टिंगल उडवण्यात आली. मी आता परत आलो आहे. मी पुन्हा आलो आहे आणि या सगळ्यांना घेऊन आलोय असा टोला फडणवीसांनी लगावला. मी याचा बदला घेणार होतो आणि या सर्वांना माफ करून मी माझा बदला घेतला आहे, असंही फडणवीसांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या
‘… तर नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था होईल’ -देवेंद्र फडणवीस
“आमच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी परिस्थिती होती मात्र…”
कालीमातेच्या तोंडात सिगारेट पाहून नेटकरी भडकले, वाचा सविस्तर
मोठी बातमी! बहुमतापेक्षा जास्त मतं मिळवत शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला
‘छमिया नाच रे’, सेहवागची विराट कोहलीवर खालच्या भाषेत टीका
Comments are closed.