बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ती’ घटना घडली आणि श्वेता बाॅलिवूड पासून दुरावली, श्वेता बच्चनचा राज उघड

मुंबई | बाॅलिवूडचे बिग बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांचं कुटुंब सतत काही ना काही कारणाने चर्चेत असतं. एवढचं नाही तर त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती करून घ्यायला लोकांनादेखील तितकीचं उत्सुकता असते. बच्चन परिवारातील प्रत्येक सदस्यानं बाॅलिवुडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. मात्र श्वेता बच्चन यापासून खुप दुर आहे.

श्वेताला नेहमीच लिहण्याची आवड होती, त्यामुळे तिला बाॅलिवूडमध्ये फार रूची नव्हती. मात्र ती लहान असताना तिचे आई-वडील दोघेही सतत कामात असल्याने तिला त्यांना सेटवर भेटायला जावं लागायचं. यादरम्यान, एकदा सेटवर ती खेळत असताना अमिताभ बच्चन यांच्या मेकअपरूममधील एका खुल्या साॅकेटमध्ये तिचं बोट अडकलं. त्यावेळी ती प्रचंड घाबरली आणि तिने सेटवर जाणं थांबवलं आणि हेच कारण असेल ज्यामुळे श्वेता बाॅलिवूडमध्ये नाही, असं ती मजेत बोललीही आहे.

श्वेताने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिला अभिनय, गायन नेहमी सोपं वाटायचं. मात्र शाळेच्या दरम्यान तिने एका नाटकामध्ये भाग घेतला. त्यावेळेस तिने खुप मेहनत देखील घेतली, तरी सुद्धा शेवटच्या सिनच्यावेळी ती संवाद विसरली. या कारणामुळे तिचं संपुर्ण नाटक खराब झालं आणि हा खुप वाईट अनुभव देखिल तिला मिळाला होता, असं श्वेताने मुलाखतीत सांगितलं.

श्वेताला बाॅलिवूडमध्ये कधीच रुची नसल्यामुळे तिनं स्वित्झरलँडला आपलं शिक्षण पुर्ण केलं आणि त्यानंतर भारतात येऊन पत्रकार म्हणून काम केलं. तसेच श्वेताला फॅशनची आवड असल्यामुळे तिने 2006 मध्ये माॅडेल म्हणून करिअरची सुरवात केली.

थोडक्यात बातम्या-

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू; लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

पंतप्रधानांनी बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची तडकाफडकी बैठक; कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता

मास्कच्या कारवाईसाठी गाडी थांबवली, तरुणाच्या कृतीनं पोलीसच पळू लागला, पाहा व्हिडीओ

अवघ्या 12 वर्षांच्या बहिणीसोबत सख्या भावाने केलं ‘हे’ दुष्कृत्य; बहीण-भावाच्या नात्याला काळीमा!

मद्यप्राशन केलेल्या तरुणीचा भररस्त्यात राडा; हटकणाऱ्या पोलिसांची धरली काॅलर, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More