बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलाशी मैत्री केली म्हणजे मुलीची शारीरिक संबंधांना परवानगी समजू नये- उच्च न्यायालय

मुंबई | मुलीचे मुलाशी मैत्रीचे संबध आहेत, म्हणजे मुलीची शारीरिक संबधाला परवानगी समजू नये. मैत्रीच्या नावाखाली मुलगा मुलीवर बळजबरी करू शकत नाही, असा निकाल काल उच्च न्यायालयाने (High court) एका निकालात दिला आहे.

आरोपी आणि तरूणीमध्ये मैत्रीपूर्ण संबध होते. आरोपीने लग्नाचे अमिष दाखवत तरूणीशी संबध प्रस्थापित केले. संबधित तरूणी गर्भवती राहिल्यानंतर तरूणाने लग्न करण्यास नकार दिला. तरूणीने आरोपी विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.

तक्रारदार तरुणीच्या संमतीने आपण शारीरीक संबध ठेवले असल्याने आरोपीने अटकपूर्व जामीनीसाठी न्यायालयात धाव घेतली, मात्र हा अर्ज न्यायमुर्ती भारती डोंगरे यांनी उपरोक्त मत नोंदवून त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

या प्रकरणातील तरूणीवर शारिरीक संबध ठेवण्यास संमती देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता की नाही? याचा तपास करण्यासाठी आरोपीच्या कोठडी चौकशीची आवश्यकता असल्याचं सांगितलं.

थोडक्यात बातम्या

म्हैसाळमधील 9 जणांच्या आत्महत्याप्रकरणी अत्यंत धक्कादायक खुलासा!

पत्रकारांच्या गोटात खळबळ उडवून देणारी बातमी, ‘या’ पत्रकाराला अटक!

महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ‘ही’ आहे भाजपची भूमिका, मुनगंटीवार म्हणतात…

शिंदे-ठाकरेंमध्ये सत्तासंघर्ष सुरु, इकडे दोन कलाकारांमध्ये वातावरण पेटलं!

शिवसेनेला आणखी एक झटका!, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचं मोठं वक्तव्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More