बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फडणवीसांना मुख्यमंत्री असल्यासारखं का वाटतं?, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं खरं कारण

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मला अजूनही राज्याचा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीवेळी ‘मी पुन्हा येईन’ हे त्यांचं वक्तव्य चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या या नव्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरु असून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका सुरु केली आहे, मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा नेहमीप्रमाणं चुकीचा अर्थ लावला गेला आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की, राज्यातील जनता अजूनही मी मुख्यमंत्री असल्याप्रमाणेच माझ्याकडून अपेक्षा करते. मराठवाडा दौऱ्यामध्ये फडणवीस यांना तसं जाणवलं होतं. गावागावातील लोक म्हणत होते की, साहेब तुम्ही मुख्यमंत्री पाहिजे होता. त्यामुळंच फडणवीस यांना लोकांमध्ये गेल्यावर मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं वक्तव्य केलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. मुख्यमंत्री घराबाहेर पडणार नाहीत, असं राज्यातील लोकांनी गृहीत धरलं आहे. कोणताही प्रसंग असो फडणवीस हेच जीवाच्या आकांताने मैदानात जातात. तसेच फडणवीस हेच लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळेच लोकांना तसं वाटतं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात भाजपचं सरकार असताना आम्ही बँकेच्या रांगेतच असायचो, असं राज्यातील लोक म्हणतात. राज्यातील जनतेला कधी विम्याचे पैसे मिळायचे, तर कधी अनुदानाचे पैसे मिळायचे. राज्यातील जनतेची हीच भावना आहे त्याला काय करायचं, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“मी चार वर्ष मुख्यमंत्री होतो पण, मला कधी फडणवीसांसारखं वाटलं नाही”

घरगुती गॅसची किंमत चक्क दुप्पट; एका सिलिंडरची किंमत अडीच हजार रुपये?

चिंताजनक ! कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये आता आढळली नवी बुरशी

आई कुठे काय करते? मालिकेतील अभिनेत्रीने वाढदिवसाला केलेल्या ‘या’ कामाचं सर्वत्रच कौतुक

“पोलिसांकडून खंडणी वसूली करून घेतली की असे राक्षस बोकाळणारच दादा”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More