बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षात आणण्याची योग्य वेळ नाही’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं कारण

नवी दिल्ली | देशात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पेट्रोल-डिझेल दराचा भडका उडाला आहे. पेट्रोल डिझेल जीएसटीच्या अंतर्गत आणण्यासाठी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली 45 वी मॅरेथॉन जीएसटी बैठक पार पाडली. या बैठकीत केंद्र सरकार आणि राज्यातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

निर्मला सितारमण यांच्या बैठकीत पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या चौकटीत आणण्यास विरोध केला. त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनं जीएसटीच्या चौकटीत आणण्याची ही योग्य वेळ नाही, असं निर्मला सितारमण यांनी सांगितलं. त्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त होईल ही लोकांची आशा पुन्हा एकदा मावळली आहे.

केरळ उच्च न्यायलायाने या विषयावर एक याचिका दाखल केली होती. यावर हा विषय जीएसटी परिषदमध्ये आधी घेण्यात आला होता आणि त्यानूसार हा विषय आम्ही घेतला आहे, असं निर्मला सितारमण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संपुर्ण देशभरात 1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू करण्यात आला. त्यानूसार उत्पादन शुल्क आणि राज्य शुल्क यांसारखे कर जीएसटीमध्ये समावेश करण्यात आले आहेत. परंतु पेट्रोल, डिझेल, एटीएफ, नैसर्गिक वायू आणि कच्चे तेल जीएसटीच्या कक्षेतून बाहेर ठेवण्यात आलं आहेत.

थोडक्यात बातम्या-

ज्यावेळेस ‘ते’ येतील त्यावेळी ते भावी सहकारी – बाळासाहेब थोरात

पंतप्रधान मोदींना आपल्या मधुर आवाजात अमृता फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा! पाहा व्हिडीओ

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

सोनू सूदच्या अडचणीत वाढ???, आयकर विभागाच्या हाती लागली ‘ती’ कागदपत्रे!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More