बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या’; भाजी विक्रेत्याच्या मुलाच्या मेसेजने डाॅक्टर भारावले

मुंबई | कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत आहे. त्यात आरोग्य सुविधांची तूट असल्याचं देशाच्या कानाकोपऱ्यातून कानावर येत आहे. अशात मुंबईतील एका प्रसिद्ध डॉक्टरांना कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत एका दानशूराचं दर्शन घडलं. गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या, या भाजीवाल्याच्या मुलाने पाठवलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजमुळे डॉक्टरांचेही डोळे पानावले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना आरोग्य सुविधांसाठी लढावं लागत आहे. यासाठी दात्यांनी पुढे येऊन गरजूंसाठी आर्थिक हातभार लावावा, असं आवाहन वारंवार केलं जातं आहे. अशा वेळी कोणी पैशांची मदत करत आहे, कोणी कोव्हिड रूग्णालयात जागा उपलब्ध करुन देत आहे, कोणी घरचा आहार कोरोनाग्रस्त रुग्णांना पुरवत आहे, कोणी कठीण काळात मानसिक पाठिंबा देत आहे, तर कोणी दुःखद प्रसंगात अंत्यसंस्कारासाठी हातभार लावत आहे. कुठल्याही स्वरुपातील मदत छोटी नसते, याचं वेळोवेळी दर्शन होत आहे.

मुंबईतील खार भागातील हिंदुजा रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. स्नेहिल मिश्रा यांनी नुकतच ट्विटरवर आपल्या भाजीवाल्या रुग्णाच्या मुलानं पाठवलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजचा स्क्रीनशॉट ट्वीट केला आहे. माझा रुग्ण भाजी विक्रेता आहे. हा मेसेज त्याच्या मुलाने पाठवला आहे. माझ्याकडे शब्द अपुरे पडले, हे खरे हिरो आहेत, असं मिश्रांनी लिहिलं आहे.

दरम्यान, हाय सर, हॉस्पिटल व्हेंटिलेटर किंवा औषधांचा खर्च भागवू न शकणारे एखादे कोरोनाग्रस्त गरीब कुटुंब आहे का? असल्यास मला कळवा, मला माझा पगार देऊन त्यांचा जीव वाचवायचा आहे’ असा भारावणारा मेसेज पाठवला. चेहरा नसलेल्या अशा हिरोंचं फारसं कौतुक होत नाही. त्यामुळेच डॉ. स्नेहिल मिश्रा यांनी आवर्जून हा मेसेज सोशल मीडियावर शेअर केला. हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालं असून सगळ्यांनीच त्याला दाद दिली आहे. अनेक जणांनी त्याच्या पावलावर पाऊल टाकत गरीब कोरोना रुग्णांना मदत करण्याची तयारीही दर्शवली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या

“भाजपचे नेते रेमेडेसिविर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं”

बाप, भाऊ, जावयानं मिळून केली तरुणीची हत्या; यवतमाळमधील घटनेनं महाराष्ट्र हादरला

‘मानवतेचा इतका पुळका असेल तर…’; सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचा जो बायडन यांच्यावर हल्लाबोल

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेला उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले…

‘हा मुंबई महापालिकेला बदनाम करण्याचा डाव’; ‘त्या’ वादग्रस्त व्हिडीओवर मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More