बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चेंबुरमधील ‘तो’ व्यक्ती आमचा मित्र नाही तर कार्यकर्ता”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नवाब मलिक म्हटलं होतं की, नीरज गुंडे हा मागच्या सरकारचा दलाल होता. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट प्रवेश होता. तो आज माझ्यावर आरोप करत आहे. त्या व्यक्तीचा आणि समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे, असा सवाल करत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चेंबुरमधील तो व्यक्ती आमचा मित्र नाही तर कार्यकर्ता आहे. चांगली माहिती देतो तो दोन नंबरच्या लोकांची. मुळात माझं लहानपण चेंबुरमध्ये गेलंय, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. आता भुजबळांना अटक का झाली?, तिर्थयात्रेला गेले होते का पंढरपुरला?, असा प्रश्न करत नारायण राणे यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नवाब मलिक यांना अधिवेशनात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. अधिवेशन म्हणजे काय? कुणाचे अधिवेशन? अधिवेशनात काय फासावर लटकवणार का?, असा प्रश्न नारायण राणे यांनी केला आहे. तसेच नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही आरोप केला होता.

दरम्यान, यावेळी नारायण राणे यांनी समीर वानखेडे यांचं समर्थन केलं आहे. आमचेही 105 आमदार आहेत. समीर वानखेडेंनी काय केलं. तर ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची चौकशी करतात. मंत्र्यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, त्यामुळे लागु द्या मागे, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

‘मरेल पण भाजप सोबत जाणार नाही’; प्रियंका गांधींचं भाजपवर शरसंधान

दिल्ली विद्यापीठाच्या आगामी दोन महाविद्यालयांना सावरकर आणि सुषमा स्वराज यांची नावं

शाब्बास पु्णेकर! पुण्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्युची नोंद नाही

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More