बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”ती’ गोष्ट माझ्या कायम स्मरणात राहील’; शरद पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

पुणे | ब्रिटिश राजवटीमध्ये भारतात ख्रिश्चन मिशनरीने केलंलं काम अभुतपूर्व आहे. ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यामांतून पुढे येत बिशप डॉ. थॉमस डाबरे यांनी समाजासाठी मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळेच थॉमस डाबरे यांचा सत्कार आज राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी शरद पवारांनी जुन्या आठवणीनां उजाळा दिला.

माझ्या कायम आठवणीत राहणारी घटना ती म्हणजे किल्लारीचा भूकंप. त्यावेळी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. त्या पहाटे माझ्या खोलीमधील हालचालीवरून काही तरी वाटले आणि मी लगेच कोयनेत फोन लावून विचारणा केली. तेव्हा भूकंप झाल्याचं सांगण्यात आलं. त्यावेळी हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. ती परिस्थिती आजही आठवते. तेव्हा ख्रिश्चन मिशनरी मार्फत गाव दत्तक घेऊन विकास कामे करण्यात आले, असं शरद पवार म्हणाले.

किल्लारीच्या घटनेसह ख्रिश्चन मिशनरीने अनेकवेळा समाजापुढे येऊन राज्यासह देशभरात कामं केलीत. परंतु मागील काही वर्षात नॉर्थमध्ये काही गोष्टींचा त्यांना सामना करावा लागला. मात्र तरी देखील ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यामांतून कार्य सुरूच राहिले असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, 1998 मध्ये बिशप डॉ. थॉमस डाबरे यांनी भारतातील बिशप परिषदेचे सेक्रेटरी जनरल म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या वसई धर्मप्रांताचे पहिले बिशप म्हणून पोप द्वितीय पॉल यांनीडॉ. थॉमस डाबरे यांची नेमणूक केली.

थोडक्यात बातम्या-

केरळमध्ये पावसाचा हाहाकार! भूस्खलनात शेकडो नागरिक दबल्याची भीती तर 26 जणांचा मृत्यू

T-20 वर्ल्ड कपला धमाकेदार सुरूवात; ‘या’ देशाने पहिला सामना 10 गडी राखून जिंकला

“भाजपने बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेब देखील बेईमान झाले नसते”

‘आठवण करून देतोय, बाप बाप असतो!’; रामदास कदमांच्या बॅनरबाजीने सर्वांच्या भुवया उंचावल्या

“निर्णय तर मोदींचा होता पण, त्यामागे डोकं कोणाचं होतं?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More