Top News पुणे महाराष्ट्र

‘त्या’ आत्महत्या केलेल्या तरुणीचे मंत्र्यासोबत प्रेमसंबंध?; पोलीस काय म्हणाले???

Photo Credit- Pixabay

पुणे | पुण्यातील महंमदवाडीत एका तरुणीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. रविवारी रात्री ही घटना घडली होती. अशातच आत्महत्या केलेल्या मुलीचे एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असून तिने यातूनच आत्महत्या केली असल्याची चर्चा सोशल मीडियावर चालू होती.

सोशल मीडियावरील या चर्चांबाबत पोलिसांना विचारलं असता त्यांनी याबाबत स्पष्टपणे नकार दिला आहे. मयत मुलगी ही काही दिवसांपुर्वी दोन मित्रांसह सोसायटीत रहायला आली होती. तिने वन बीएचके फ्लॅट भाडयाने घेतला होता यातील बेडरूम ती वापरत होती. तिच्या घरच्यांनी माहिती दिल्यानुसार ती पदवीधर असून इंग्लिश कोर्स करण्यासाठी आली असल्याचं पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितलं आहे.

पूजा लहू चव्हाण असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. महंमदवाडीतील ए वन पार्कच्या सोसायटीत ती रहात होती. रविवारी रात्री ती आपल्या दोन मित्रांसह घरात होती. मात्र मध्यरात्री तिने उडी मारली यामध्ये ती जखमी झाली आणि तिचा रूग्णालयात नेण्यापुर्वीच मृत्यु झाला होता.

दरम्यान, पूजाच्या आई-वडिलांना बोलावून चौकशी केली असता त्यांनी ती एका आजाराने ग्रस्त असल्याचं सांगितलं. तर सोशल मीडियावरील चर्चेप्रमाणे स्थानकात अद्याप कोणतीही तक्रार आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सरकार शोधतंय स्वयंसेवक करावी लागणार ‘ही’ कामं

‘या’ कारणामुळं अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी

आठवड्यात तीन सुट्ट्या?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले, सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले”

धक्कादायक! सासऱ्याने आपल्या गर्भवती सुनेवरच केला बलात्कार त्यानंतर दिली ही धमकी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या