Top News खेळ

रोहित शर्मावर शंका घेणं महागात; ‘त्या’ काकांना काढावी लागली अर्धी मिशी!

मुंबई | भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झालीये. या सामन्यात भारताचा हिटमॅन रोहित शर्माने तब्बल 11 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी केली. यामुळे रोहितच्या पुनरागमनाची चर्चा जोरात रंगली होती.

दरम्यान रोहितच्या पुनरागमनामुळे एका काकांना त्यांची अर्धी मिशी कापावी लागली आहे.

एका ट्विटर युजरने सिडनी कसोटीआधी ट्विटरवर प्रश्न विचारला होता की ‘रोहित शर्माचा अंतिम अकरामध्ये समावेश करण्यासाठी कोणाला डच्चू देण्यात यावा.?’ या प्रश्नावर @Ajay81592669 यांनी ‘रोहित कसोटी क्रिकेटपटू असेल तर मी जगातला सर्वात हँडसम पुरुष आहे. ब्राॅड आणि अँडरसनचं एकेक षटक खेळून काढून दाखवू दे त्याला. ते जाऊ दे. स्टार्क, हेजलवुड आणि कमिन्स यांचे सगळे मिळून तीस चेंडू खेळून काढू दे, मी अर्धी मिशी काढून टाकतो,’ असं म्हटलं होतं.

सिडनी कसोटीत मैदानात उतरल्यावर रोहित शर्माने 77 बॉल खेळले. त्यामुळे @Ajay81592669 यांनी खरंच त्यांचा शब्द पाळत अर्धी मिशी काढून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला फटकारल्यावर थोरातांनी केला ‘हा’ सवाल

औरंगाबाद नामांतरावर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

…तर 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीरपणे काँग्रेसला फटकारलं, म्हणाले…

रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळून अपघात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या