Top News पुणे महाराष्ट्र

‘त्या’ वक्तव्यावर खडसेंनी माफी मागावी अन्यथा…; ब्राम्हण महासंघाचा इशारा

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्ष नेते आणि माजी आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना केलेल्या वक्तव्यावरुन ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे.

मुख्यमंत्री पद मी ब्राम्हणाला दान केल्याचे खडसे यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर पुण्यातील ब्राम्हण महासंघाने आक्षेप घेत त्यांनी तातडीने मागावी अशी मागणी केली आहे.

या प्रकरणावर ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, “फडणवीसांवर टीका करताना खडसेंनी जे वक्तव्य केले ते त्यांनी मागे घ्यावे, अन्यथा खडसेंचा एकही कार्यक्रम पुण्यात होऊ देणार नाही”.

एकनाथ खडसेंच्या या वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील, असही आनंद दवे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“ज्या दिवशी बकरीशिवाय ईद साजरी होईल, तेव्हाच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होणार”

“मी अर्णब गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवूण दाखवा”

…तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना स्मशानात पाठवू, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

पुढील 6 महिन्यात नागपूरची सर्व वाहनं सीएनजी करा- नितीन गडकरी

पुढील आयपीएल भारतात की बाहेर?; गांगुलींनी दिलं उत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या