बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ महिलेने स्वत: अंगातील झगा काढला; अनिल देशमुखांनी सांगितलं जळगाव वसतीगृहात नेमकं काय घडलं!

मुंबई | जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतीगृहात पोलिसांनी महिलांना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडलं ही बातमी वनव्यासारखी राज्यभरात पसरली होती. मात्र या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांवरील लावलेल्या या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. महिला वसतिगृहात पोलिस कर्मचारी जाऊ शकत नाही, असंही सांगितलं आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी जी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली होती, यामध्ये चार महिला अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. त्यांनी सांगितलं की, ‘या वसतीगृहात 17 महिला राहतात. 20 फेब्रुवारी रोजी वसतीगृहातल्याच महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गरबा चालू असतांना एका महिलेला अंगातल्या झग्याचा त्रास होत होता म्हणून तिने झगा काढून ठेवला होता. या दरम्यान त्याठिकाणी बाकी कुठलही दुष्कृत्य झालं नाही. त्यामुळे पोलिसांनी महिलांना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडलं ही रत्नमाला सोनार यांनी केलेली तक्रार खोटी असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

याप्रकरणात रत्नमाला सोनार या महिलेनं तक्रार केली आहे. तिच्या नवऱ्याने बऱ्याचदा सांगितलं माझी बायको वेडसर आहे, तिला मनोरूग्णालयात भरती करा. याबद्दल अधिक तपास करता वसतिगृहात एकही पोलिस कर्मचारी आत जाऊ शकत नाही, असं निष्पन्न झालं आहे.

दरम्यान, महिला अधिकाऱ्यांनी वसतिगृहात भेट देऊन तेथील कामकाज पाहिलं, तिथल्या महिलांशी चर्चा केल्यावर रजिस्टरमध्ये कोणी पोलिस कर्मचारी वसतिगृहात आल्याची कुठलीच नोंद नाही. त्यामुळे पोलिसांनी महिलांना कपडे काढून नाचायला लावल्याचा प्रकार कुठेही आढळून आला नाही, असा अहवाल महिला अधिकाऱ्यांनी दिल्याने अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या

कोरोना पाठोपाठ अमरावतीत ‘या’ आजाराचा शिरकाव!

पोलिसाच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या; उस्मानाबादमध्ये घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला!

‘या’ अधिकाऱ्याची अजब मागणी, म्हणाले…,’मला घोड्यावरून ऑफिसला यायचंय’

औरंगाबाद कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या प्रकाराची अजित पवारांकडून दखल; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

परदेशातील व्यक्तीलाही दिला सोनू सूदने मदतीचा हात; केलं ‘हे’ कौतुकास्पद काम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More