बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छोटा राशिद खान! खुद्द सचिन तेंडुलकरने व्हिडीओ शेअर करत केलं कौतूक; पाहा व्हिडीओ

मुंबई | अफगाणिस्तानचा माजी कर्णधार आणि लेग ब्रेक गोलंदाज राशिद खान मैदानात असल्यावर फलंदाजांच्या मनात धडकीच भरते. आपल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर त्याने अनेक दिग्गज फलंदाजाच्या दांड्या गुल केल्या आहेत. अशातच आता छोट्या राशिद खानची सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे.

क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने त्याच्या इस्ट्राग्राम अकाउंटवरून एक विडिओ शेअर केला आहे. यात एक चिमुकला हुबेहूब राशिद खानसारखी गोलंदाजी करताना दिसतोय. त्यात हा लहान मुलगा इनस्विंग, आऊटस्विंग तसेच कॅरम बॉल देखील टाकताना दिसतोय. सचिन तेंडुलकरने हा व्हिडीओ शेअर करताना हा छोट्या राशिद खानचं तोंडभरून कौतुक केलंय.

मला हा व्हिडिओ माझ्या एका मित्राकडून मिळाला. हा खरंच खूप सुंदर व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या लहान मुलाचं क्रिकेटबद्दलचं प्रेम आणि इच्छाशक्ती अभिमानास्पद असल्याचं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ स्पेनमधील असल्याचं सांगितलं जात आहे. स्पेन देशात क्रिकेटला जास्त महत्व दिलं जात नाही. स्पेनमध्ये बहुतांशी फुटबॉल चाहते आहेत. पण या लहान मुलांची गोलंदाजी पाहून आता जागतिक दर्जाचे खेळाडू देखील या छोट्या राशिद खानचं कौतुक करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

थोडक्यात बातम्या-

“एकाला बाहेर काढा मग, आपोआप देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

फॅबुलस ड्युपलेसी! अंतिम सामन्यात फाफची 86 धावांची धमाकेदार खेळी, कोलकाताला ‘इतक्या’ धावांचं लक्ष्य

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

“उद्धव ठाकरेंचं आजचं भाषण म्हणजे ‘प्रबोधनकार ठाकरे’ इज बॅक”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More