‘…तेव्हाच भाजपसोबत जायचं ठरलं होतं’; भुजबळांनी सगळंच सांगून टाकलं

मुंबई | गेल्या काही महिन्यांपूर्वी शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. हा सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का होता. यावेळी राजीनाम मागे घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी पवारांपुढे केली होती. पण यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar) नेमका राजीनामा का दिला होता, असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी भाष्य केलंय. भुजबळांनी यावेळी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शरद पवार यांनी राजीनामा दिला. तेव्हा सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचं ठरलं होतं. सुप्रिया सुळे या अध्यक्ष होतील मग राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल, असं ठरलं होतं, असं म्हणत छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

15 दिवस पवारांच्या घरात चर्चा झाली असावी. अजितदादांना ते माहिती होतं. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत जायचं ठरलं होतं. म्हणूच शरद पवार यांनी राजीनामा दिला, असं छगन भुजबळ म्हणाले.

2019 ला शरद पवारांनी भाजपला सोबत येण्याचा शब्द दिला. मात्र ते भाजपसोबत गेले नाहीत. पण शब्द खरा करण्यासाठी, दिलेला शब्द पाळण्यासाठी अजित पवार भाजपसोबत गेले आणि पहाटेचा शपथविधी घेतला, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-