बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लोकांना वाटलं मी लय सिरीयस आहे, आपलं शेवटचं मत टाकावं’; दानवेंनी सांगितला मजेशीर किस्सा

पुणे | केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या भाषण शैलीसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. दानवे आपल्या भाषणातून त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे रंजक किस्से उलगडून सांगत असतात. आज पुण्यात रावसाहेब दानवे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. या कार्यक्रमास खासदार छत्रपती संभाजीराजे देखील उपस्थित होते.

मी सर्व पदं उपभोगले आहेत. मला माझ्या मतदारसंघातील लोकांनी भरभरून पदं दिली आहेत. मी केंद्र सरकारमध्ये तीनवेळा मंत्री झालो तरी मी माझा साधेपणा सोडला नाही. काल मी हैदराबादला माझ्या मित्राकडे गेलो होतो. मोठा माणूस आहे तो, तेव्हा तो म्हणाला की, दादा तुम्ही खादीचा शर्ट घ्या, का तर तुमचा शर्ट फाटला आहे. नवीन शर्ट घ्या. मी मित्राला म्हणालो, शर्ट फाटला आहे म्हणून काय फरक पडला? असं दानवे म्हणाले.

दानवे यांनी निवडणुकीचा जुना किस्सा सांगितला. निवडणुकीत आजारी असतानाही साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून आलो. माझं निवडून आल्याचं प्रमाणपत्र घेण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि बबन लोणीकर उपस्थित होते. त्यावेळी लोणीकर म्हणाले एकही सभा न घेता एवढ्या मोठ्या मताच्या फरकाने कसे निवडून आले. तर, खोतकर म्हणाले की, लोकांना वाटलं लय सिरीयस आहे म्हणून लोकांनी शेवटचं मत देऊन टाकावं म्हणून निवडून आले असतील. हा दानवेंनी किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ पसरला.

दरम्यान, पुढं बोलताना दानवे म्हणतात की, आता तुम्ही इथं सर्व पुण्याची माणसं आहात. यात कोणी फाटका शर्ट घातलेला माणूस येऊन बसलाय का सांगा मला. घरातील बाईने तुम्हाला सांगितलं असेल की, तुमचा शर्ट फाटला आहे, बदलून घ्या, असा कोणी माणूस आहे का? फाटलेल्या शर्टाचा. बघा माझा शर्ट इथं फाटला आहे, असं म्हणत दानवेंनी भरसभेत त्यांचा फाटलेला शर्ट दाखवला.

थोडक्यात बातम्या –

‘…तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक?’; ठाकरे सरकारला घरचा आहेर

“मोदीजी अमेरिकेतून माझ्यासाठी काहीतरी शाॅपिंग करा”

“सोनू सूद जिवंत असो वा नसो, लोकांना मोफत उपचार मिळालाच पाहिजे”

मी जेलमध्ये असताना ‘त्यांनी’ माझा जीव वाचवला – छगन भुजबळ

काँग्रेस नेते टीएस सिंहदेव म्हणाले, ‘पंजाबमध्ये बदल होऊ शकतो तर…’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More