बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आशा भोसलेंनी सांगितलं स्मृती इराणींच्या विजयाचं ‘हे’ कारण

नवी दिल्ली | मोदींच्या शपथविधी सोहळ्याला आलेल्या ज्येष्ठ गायीका आशा भोसलेंनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच कौतुक करत त्यांच्या विजयाचं कारण सांगितलं आहे.

शपथविधीनंतर मी भयंकर गर्दीत अडकले होते. स्मृती इराणी वगळता कोणी माझ्या मदतीसाठी पुढे आलं नाही. त्यांच्या मदत करण्याच्या स्वभावामुळे आणि सवयीमुळेच त्या जिंकल्या आहेत, असं आशा भोसलेंनी म्हटलं आहे.

माझी स्थिती पाहून स्मृती इराणी यांनी मी घरी सुखरूप पोहेचेन याची खात्री केली, असं ट्वीट करत आशा भोसलेंनी स्मृती इराणींनी केलेल्या मदतीचा माहिती दिली आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला आशा भोसलेसह सर्व ज्येष्ठ कलाकार, खेडाळू, नेतेमंडळींनी हजेरी लावली होती.

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून भारतासह सर्व संघ आम्हाला घाबरतात; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

-जेडीयू सत्तेत सहभागी न झाल्याने चर्चांना उधाण; जेडीयूने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

-‘या’ संघाला हरवणे सगळ्यात कठिण; ग्लेन मॅकग्राचा दावा

-“देशाचा विकास आणि प्रगतीसाठी नरेंद्र मोदींना साथ देऊ”

-…म्हणून मोदींच्या नव्या मंत्रीमंडळाची पहिलीच बैठक झाली रद्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More