औरंगाबाद महाराष्ट्र

…म्हणून मी आणि प्रीतम मुंडे संसदेत हसलो- रक्षा खडसे

जळगाव | भाजपच्या खासदार भारती पवार सभागृहात बोलत असताना खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे संसदेत हसतानाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरच रक्षा खडसेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मी आणि प्रीतम मुंडे सहज हसलो होतो. त्याचा भारती पवार यांच्या भाषणाशी काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण रक्षा खडसे यांनी दिलं आहे.

देशातील अनेक महत्वाच्या विषयावर आम्ही चर्चा करतो त्याकडे लक्ष दिलं जात नाही. आम्ही सहज हसलो हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज नाही, असंही रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, आम्ही भारती पवारांच्या भाषणाला हसलो नाही तर याउलट त्यांना पाठिंबा देण्यासाठी थांबलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस या विषयाचे भांडवल करत आहे, असा आरोप रक्षा खडसेंनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-नारायण राणे कोणत्या मतदारसंघातून विधानसभा लढवणार?; नितेश राणे म्हणतात…

-पुण्याजवळील लोणी काळभोरजवळ भीषण अपघात; 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू

-“राष्ट्रवादी जळगावमध्ये इतक्या जागा लढवणार”

-“आघाडीच्या नेत्यांच्या घरी आम्ही भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण घेऊन गेलो नाही”

-नवी मुंबईकरांसाठी महापालिकेडून मोठी खुशखबर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या