…म्हणून मला घाई-गडबडीत लग्न करावं लागलं; अमिताभ बच्चन यांचा खुलासा

मुंबई | बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्या लग्नाचा 46 वा वाढदिवस सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी आम्हाला कशाप्रकारे घाई-गडबडीत लग्न करावं लागलं याबाबतचा किस्सा अमिताभ बच्चन यांनी सांगितला आहे.

मी, जया आणि आमच्या काही मित्रांना लंडनला सुट्ट्यांसाठी जायचं होतं. त्यावेळी माझं आणि जयाचं प्रेमप्रकरण सुरु होतं. त्यामुळे माझे वडील हरिवंशराय बच्चन यांनी अशी अट घातली की, आम्ही लग्न केलं तरच एकत्र जाऊ शकतो, असं अभिताभ बच्चन यांनी सांगितलं.

वडिलांच्या या अटीमुळे मी पेचात पडलो होतो. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी आम्ही लग्न केलं आणि रात्री लंडनचं विमान पकडलं, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 3 जून 1973 रोजी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांनी लग्न केलं होतं.

महत्वाच्या बातम्या

-अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘हाताची साथ सोडली’; जाता जाता काँग्रेसचे टेन्शन वाढवणार

-काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार; हे विद्यमान आमदार भाजपच्या वाटेवर?

-मुस्लिम मतं न मिळाल्यानेच आमचा पराभव; प्रकाश आंबेडकराचं मोठं वक्तव्य

-महादेव जानकर यांचा स्वाभिमानी बाणा; आगामी निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढणार नाही

-विवाहसंस्थेवर माझा विश्वास नाही- सलमान खान