बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#सकारात्मक बातमी | 105 वर्षीय आजोबा आणि 95 वर्षीय आजीची कोरोनावर मात

लातूर | कोरोना महामारीने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीव गेले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण वर्गाला सर्वात जास्त ग्रासलं आहे. यातच आता एक सकारात्मक उर्जा देणारी बातमी समोर आली आहे. लातूरमधील 105 वर्षीय आजोबांनी आणि 95 वर्षीय आजींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

लातूरमधील कृष्णानगर येथे राहणाऱ्या 105 वर्षीय धेनू उमाजी चव्हाण आणि 95 वर्षांच्या मोताबाई चव्हाण या जोडप्यांनी कोरोना झाल्याचं कळताच न घाबरता कोरोनावर वेळेवर उपचार सुरू केले. डाॅक्टरांच्या मेहनतीने आणि चव्हाण दामपत्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी ट्विट करत ही बातमी दिली आहे.

माझ्या मतदारसंघातील काटगाव तांडा भागातील कृष्णानगरयेथील 105 वर्षांचे धेनू उमाजी चव्हाण आणि 95 वर्षांच्या मोताबाई चव्हाण या दाम्पत्याने वेळेवर उपचार घेऊन आज कोरोनावर मात केली. सध्याच्या वातावरणात वाचायला मिळालेली ही एक अत्यंत सकारात्मक बातमी आहे. चव्हाण दाम्पत्यासह इतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी अहोरात्र झटणारे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील सर्व डॉक्टर, परिचारिका यांचे मी आभार मानतो. नागरिकांनाही माझी विनंती आहे, कोरोनाची लक्षणे असतील तर चव्हाण दाम्पत्याप्रमाणे तातडीने तपासणी करून उपचार घ्या, असं ट्विट धिरज देशमुख यांनी केलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरूणाई मोठ्या प्रमाणावर बाधित होताना दिसत आहे. त्यामुळे तरूण वर्गात देखील चिंतेचं वातावरण आहे. अशातच आता चव्हाण दामपत्यांने कोरोनाने कोणीही बरं होऊ शकतं, असा संदेश दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी तातडीने तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

एका डोळ्यात हसू तर एकात आसू; चेन्नई संघासाठी दु:खद बातमी

‘राॅ’ मटेरियलसाठी अजित डोवाल मैदानात; लसीसाठी लागणारा कच्च्या माल पुरवण्यास अमेरिका तयार

अफवा पसरवणाऱ्यांची संपत्ती जप्त करणार; योगी सरकारचा अजब फतवा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने मोदी सरकारला झापलं, म्हणाले

“मन की बात वेळीच समजून घेतली असती तर ही वेळ आलीच नसती”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More