Top News राजकारण

2 दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ काढणं; देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. दोन दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ काढण्यासारखं असल्याचं फडणवीस म्हणालेत.

पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अधिवेशन केवळ दिवसांचं होतंय. मात्र महाराष्ट्रात अनेक असून शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत.”

ते पुढे म्हणाले, “हिवाळी अधिवेशन किमान दोन आठवड्यांसाठी घेण्याची आमची मागणी होती. मात्र, राज्य सरकारने ती मान्य न करता केवळ दोन दिवसांचं अधिवेशन ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सरकार चर्चेपासून पळ काढतंय.”

“दोन दिवसांसाठी सर्व सदस्य योग्य ती काळजी घेऊन येणार असतील तर दोन आठवड्यांचं अधिवेशन घेतलं पाहिजे, अशी आमची मागणी होती. ती आमची मागणी मान्य झालेली नसल्याचं,” फडणवीस म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

“शेठजी लायटिंग छान होती आणि तुमचा डान्स तर लाजवाबच”

अमरीश पटेल यांचा विजय सत्ताधाऱ्यांसाठी मोठा राजकीय धक्का- गिरीश महाजन

शीतल आमटेंच्या आत्महत्येबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या