बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार ‘पत्रकार मारिया रेसा’ आणि ‘दिमित्री मुरातोव्ह’ यांना जाहीर!

स्टॉकहोम | जगातील सर्वोच्च पुरस्कार समजल्या जाणारा नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत.  फिलीपाईन्स आणि रशिया या दोन राष्ट्रांमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत पत्रकारितेच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करणारे पत्रकार मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव्ह यांना 2021चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार जाहीर करताना नोबेल समितीने म्हटलं आहे की, निष्पक्ष, स्वतंत्र आणि वस्तुस्थितीवर आधारित असलेली पत्रकारिता सत्तेचा गैरवापर, लबाडी आणि युद्धप्रचारापासून संरक्षण करते. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पुरस्कार्थ्यांना 10 मिलियन स्वीडिश क्रोना म्हणजेच सुमारे आठ कोटी रूपयांची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.

मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव्ह हे दोघेही पेशाने पत्रकार आहेत. समाजातील विविध प्रश्न त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जगासमोर मांडणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल सातत्याने आवाज उठवणे, याकरिता रेसा आणि मुरातोव्ह यांना संयुक्तपणे नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.

दरम्यान, रेसा आणि मुरातोव्ह यांची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 329 उमेदवारांमधून निवड करण्यात आलेली आहे. रेसा यांना त्यांच्या रॅपलर या वृत्त संस्थेच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर, हिंसाचाराचा वापर आणि फिलीपाईन्स या देशातील मुळ वाढती हुकूमशाही उघड करण्यासाठी रेसा यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, इथं आमच्या भगिनी कधीही लाचार होणार नाहीत”

“पंतप्रधानांच्या कानापर्यंत ‘महाराष्ट्र बंद’चा आवाज पोहोचवणार”

‘तुम्ही त्याच्या भविष्यासोबत….’; रविना टंडनही भडकली, बॉलिवूड तारकांचा आर्यनला पाठिंबा, !

“महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही”

सर्वोच्च न्यायालयाने केली लखीमपूर हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More