बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेअर बाजारात एलन मस्क मालामाल! एका दिवसात कमावले 27,15,00,00,00,000 रूपये

नवी दिल्ली | अमेरिकेची प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार उत्पादन करणारी टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांच्या संपत्तीत विक्रमी वाढ झाली आहे. हेर्ट्ज ग्लोबल होल्डिंगने एका दिवसात दिलेल्या 1 लाख इलेक्ट्रिक कारची ऑर्डरमुळे मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 14.9 टक्के म्हणजे 1 हजार 45 डॉलरवर पोहचला. त्यामुळे टेस्ला कंपनीतील 23 टक्के शेअरची किंमत आता 289 अब्ज डॉलर झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या इंडेक्सनुसार एलम मस्क यांच्या एका दिवसात झालेल्या संपत्तीतील वाढ ही जगातील पहिलीच घटना आहे. सोमवारच्या एका दिवसात 36 अब्ज डॉलरची म्हणजे 2 लाख 71 हजार डॉलरची वाढ झाली आहे. मागील वर्षात चीनमधील बाटलीबंद पाणी विक्री करणारी नोंगफ्रू स्फ्रिंग कंपनीचे मालक झोंग शानशान यांच्या संपत्तीत 32 बिलियन डॉलरची वाढ झाली होती.

2021 वर्षाच्या सुरुवातीला एलन मस्क यांच्या संपत्तीत 119 अब्ज डॉलची वाढ झाली होती. एलन मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसात झालेल्या वाढीमुळे त्यांच्या टेस्ला कंपनीचं बाजारमुल्य आता 3 ट्रिलियन झालं आहे. त्यासंदर्भात एलन मस्क यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

दरम्यान, टेस्ला कंपनीसह रॉकेट उत्पादन कंपनी स्पेस एक्सचे देखील एलन मस्क सीईओ आणि भागधारक आहे. ऑक्टोबर महिन्याच्या काळात या कंपनीची किंमत 100 अब्ज डॉलरच्या घरात गेली आहे. त्यामुळे एलन मस्क यांची वैयक्तीक संपत्ती 288.6 अब्ज डॉलर इतकी प्रंचड झाली आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

“ज्यांनी तुमच्या हातात दगड दिले त्यांनी तुमचं काय भलं केलं?”

यंदाच्या दिवाळीतही चीनी दिव्यांचाच लखलखाट; चीनी मालाची कोट्यवधींमध्ये उलाढाल

‘समीर वानखेडे 2 लोकांचे फोन टॅप करत आहे’, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

‘त्या’ लेटर बाॅम्बवर क्रांती रेडकरचं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर, म्हणाली…

स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याने केली समीर वानखेडेंची पाठराखण, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More