बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

36 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीला जाळ्यात ओढलं, तिच्याच बंगल्यावर राहून धक्कादायक प्रकार

नागपूर | एका अज्ञात व्यक्तीने एका महिलेला आपला बिझनेस असून 25 राष्ट्रांमध्ये नेटवर्क असल्याची थाप मारुन तिला आपल्या जाळ्यात ओढले. तिच्याकडे अनैसर्गिक संबंधाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यावर दिला बेदम मारहाण केली. याप्रकरणी त्याला सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

अमोल उर्फ सक्षम मेश्राम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर नागपूरमधील महिलेशी अनैसर्गिक कृत्य करुन बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन सोनेगाव पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी हा महिलेच्या घरी खोली भाड्याने घेण्याच्या नावाखाली आला होता. त्याने स्वत:ला देश-विदेशात राहत असल्याचे तसेच आपला बिझनेस असून 25 राष्ट्रांत असल्याचे सांगितले. त्यामुळे ही महिला त्याच्या थापांना भाळली. त्यानंतर त्याने 2020 मध्ये महिलेला लग्नाचे आमिष दाखवले.

तो तिच्याच बंगल्यावर राहू लागला. तो अनैसर्गिक संबंधासाठी बळजबरी करायचा. नकार दिला असता तो तिला बेदम मारहाण करत होता. त्याने महिलेकडे 10 लाख रुपये व्यवसायासाठी मागितले. मात्र तिने पैसे देण्यास नकार दिल्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्ररीत केला आहे.

थोडक्यात बातम्या –

सर्वात मोठी बातमी: कोरोनावरील लस घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही!

नवऱ्यानं केली नसबंदी, त्यानंतर पत्नी प्रेग्नंट राहिल्यानं छळ, तपासात धक्कादायक माहिती समोर

कोरोनामुळे पत्नीला आलं टेन्शन, पतीनं केलं असं काही की पोलिसांनी केली अटक

वातावरण बदलतंय, कोरोनासोबत डेंग्यूचाही धोका वाढतोय; अशी घ्या स्वत:ची काळजी!

“मोदीजी, आमच्या लेकरांची लस परदेशात का पाठवली?”; देशव्यापी मोहीम सुरु

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More