बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! 37व्या वेळी विवाहबंधनात 28 बायका, 135 मुलं, 126 नातवंडांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर बऱ्याचदा विनोदी, काही थक्क करणारे तर काही मनोरंजन करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, काही व्हिडिओ असे असतात जे आपल्याला अचंबित करतात आणि तितकेच हसवणारेही असतात. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओनं लोकांना फक्त हैराण केलं नाही तर विचार करायलाही भाग पाडलं आहे, की खरंच असं होऊ शकतं का? आता तुम्हीही असा विचार करत असाल, की या व्हिडिओमध्ये असं नेमकं काय आहे. तर, या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबासमोर 37 व्या वेळी विवाहबंधनात अडकत असल्याचं दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक वयस्क व्यक्ती विवाहबंधनात अडकत असल्याचं दिसत आहे. पहिल्यांदा तर हे सगळं सामान्य वाटतं. मात्र, जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहे. हा व्यक्ती 37 व्या वेळी नवरदेव झाला आहे. याआधी या व्यक्तीनं 36 वेळा लग्नगाठ बांधली आहे. इतकंच नाही तर त्याला अनेक मुलं आणि नातवंडेही आहेत. त्यामुळे, व्हायरल झालेला हा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर इंडियन पोलीस सर्व्हिसचे अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं, की 28 बायका, 135 मुलं आणि 126 नातवंडांच्या उपस्थितीत हा व्यक्ती 37 व्या वेळी लग्न करत आहे. त्यांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. व्हिडिओमध्ये या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यही अत्यंत आनंदात दिसत असून ते नव्या नवरीचं मोठ्या उत्साहानं स्वागत करत आहेत.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या –

नाशिकमध्ये नियम मोडणाऱ्या दुकानदारांकडून तब्बल एवढ्या कोटी रुपयांचा दंड वसूल

भारताची B-टीम श्रीलंकेविरूद्ध भिडणार; शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्याची शक्यता

मित्रांचा दुरावा नियतीला देखील अमान्य; तोंड न पाहण्याची शपथ विसरुन मित्राचा जीव वाचवला

राज्य शासनाच्या जाचक अटीमुळे 2 महिन्यांपासून 1500 रुपये मिळवण्यासाठी रिक्षाचालकांची धावपळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीत ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More