बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून 60 वर्षांचे आजोबा चढले विजेच्या खांबावर, अन्…

राजस्थान | राजस्थानमधील एका 60 वर्षाच्या वृद्धाला दुसरं लग्न करायचं होतं. मात्र त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांना नकार भेटत असल्यामुळे त्यांनी चक्क विजेच्या खांबावर चडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचं कळतंय.

सोबरन सिंह या व्यक्तीचं नाव असून चार वर्षाांआधी या आजोबांच्या पत्नीचं निधन झालं आहे. सोबरन यांना तीन मुलं आणि दोन मुली आहेत. त्यांच्या सर्व मुलांचं लग्न झालं आहे. तसेच आजोबांना नातवंडसुद्धा आहेत. मात्र तरी आजोबांना दुसरं लग्न करायचं आहे, असा हट्ट ते सतत त्याच्या मुलांसमोर करायचे. त्यांच्या ह्या हट्टाला मुलांकडून नकार भेटत होता.

आपला हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी ते विजेच्या खांबावर चढले. ज्यावेळी ते विजेच्या खांबावर चढले तेव्हा तारांमध्ये करंट नव्हता. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. कुंटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी खूप समजावल्यानंतर हे आजोबा खाली उतरले. त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

दरम्यान, या घटनेसंदर्भात पोलिस अधिकारी सुमन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या आजोबांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

कंगाल पाकिस्तानला भारत देणार कोरोना लसीचे इतके कोटी डोस!

…तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाहीत- निलेश राणे

उधारीचे पैसे मागणं पडलं महागात; विधवा महिलेसोबत घडली अत्यंत धक्कादायक घटना

गेल्या 10 दिवसांपासून जळतंय ओडिसाचं जंगल; हजारो प्राण्यांच्या जिवाला धोका

…अन् भर पत्रकार परिषदेत खासदारानं महिला आमदाराच्या गालाला लावला हात, पाहा व्हिडिओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More