Top News देश

धक्कादायक! साठ वर्षाच्या ‘या’ खासदाराने केलं 14 वर्षाच्या मुलीसोबत लग्न

Photo Credit- facebook/ @volf.tv · Media/News Company

नवी दिल्ली | आपलं शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमधील एका 62 वर्षाच्या खासदाराने आणि धार्मिक नेत्याने 14 वर्षाच्या मुलीशी विवाह केला आहे. बलुचिस्तान प्रांतातील मौलाना सलाहुद्दीन आयुबी असं खासदाराचं नाव आहे. ते जमीअत उलेमा-ए-इस्लामचे नेते आहेत.

चित्रालमधील महिला कल्याणासाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने तक्रार केल्यानंतर पाकिस्तानमधील पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे. आपल्या वयाच्या चारपटीने कमी असलेल्या लहान मुलीसोबत लग्न केल्याची बातमी सोशल माध्यमांवर पसरली आहे. त्यामुळे या खासदारावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे.

ज्या 14 वर्षाच्या मुलीसोबत खासदाराने विवाह केला आहे ती मुलगी जुगूर येथील गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थीनी आहे. तिची 28 ऑक्टोबर 2006 अशी जन्मतारीख शाळेत नोंदवली गेली आहे, अशी माहिती पित्रल पोलीस स्टेशनमधील इन्स्पेक्टर सज्जाद अहमद यांनी दिली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेल्या जन्मतारखेनुसार तिचं लग्नाचं वय झालं नसूनही खासदाराने तिच्याशी लग्न केल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे.

दरम्यान, मुलीच्या वडिलांनी या लग्नाला नकार दिला होता मात्र त्यांच्याविरोधात गोष्टी जाऊ लागल्या तेव्हा त्यांनी कबूल केलं की हे लग्न गेल्या वर्षी झालं होतं. पण पाकिस्तानातील कायद्यानुसार मुलीचं वय 16 होईपर्यंत मुलींच्या लग्नास परवानगी नाही.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शब्दाचे पक्के होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र लबाड”

रायगडावर महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचं असेल तर पाळावे लागणार ‘हे’ नियम!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ‘तो’ व्हिडीओ झाला लीक, संजय राठोडांचा संबंध असल्याचा दावा!

राज्य सरकारमधील ‘या’ नेत्यांवर कारवाई का होत नाही?- भाजप

…तोपर्यंत पतंजलीच्या ‘कोरोनिल’ विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही- अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या