कडक सॅल्यूट! पंक्चर काढणाऱ्या 60 वर्षीय नागरिकाने दिले 90 ऑक्सिजन सिलेंडर
भोपाळ | कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा मोठा तुडवटा जाणवू लागला आहे. यामुळे मध्य प्रदेशमधील श्योपूर भागातील एका पंक्चर काढणाऱ्या व्यक्तीने गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन 90 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिलेत.
पंक्चर काढण्यासोबत ऑक्सिजन पुरवठा करण्याचा छोटासा व्यवसायही करतो. या भागात ऑक्सिजनची कमतरता असल्याची माहिती मिळाली. यानंतर तातडीने 90 ऑक्सिजन सिलेंडर जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिले, असं रियाज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच प्राणाशी संघर्ष करत असलेल्यांना मदत करण्यात सक्षम असल्यामुळे मदत करू शकलो. केवळ माझे योगदान दिलं आहे, असंही रियाज यांनी म्हटलं आहे.
रियाज यांची मोठी मदत झाली. त्यांनी वेळीच 90 ऑक्सिजन सिलेंडर दिले. त्यांनी दिलेले ऑक्सिजन सिलेंडर ग्वाल्हेर आणि भिंड येथे पाठवले आहेत. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या अन्य व्यापाऱ्यांकडूनही मदत केली जात आहे. याचा उपयोग जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रभावीपणे केला जात आहे, असं श्योपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षांनी सांगितलं.
दरम्यान, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम दिसत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही वाढत चाललं आहे.
थोडक्यात बातम्या-
“मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही केंद्राची इच्छा आहे का?”
अखेरच्या श्वासापर्यंत दिली साथ; पतीच्या मृतदेहाला मिठी मारून पत्नीने सोडला जीव
“मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका NCP स्पॉन्सर्ड”
“मला, पत्नीला आणि मुलीला कोणी जीवे मारलं तर त्याला शरद पवार जबाबदार असतील”
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी रामदास आठवलेंनी सांगितला ‘हा’ उपाय
Comments are closed.