बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

78 वर्षांच्या आज्जीने सर्व संपत्ती राहुल गांधींना केली दान, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली | अनेक लोक आयुष्यभरातील संपत्ती उतारवयामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला दान करतात. त्यातच आता उत्तराखंडंमधील एका वृद्धेने सर्व संपत्ती राहुल गांधींना (Rahul Gandhi) दान केली आहे. पुष्पा मुंजियाल( Pushpa Munjiyal) असं या व्यक्तीचं नाव आहे. राहुल गांधी यांची देशाला गरज आहे असं सांगत संपत्ती दान करण्याचा निर्णय वृद्ध महिलेने घेतला आहे.

50 लाख आणि 10 तोळे सोनं इतकी या वृद्ध व्यक्तीची संपत्ती आहे. पुष्पा मुंजियाल या उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये राहतात. त्यांनी न्यायालयात मृत्यु पत्र सादर केलं असून सर्व संपत्तीचे हक्क राहुल गांधींना दिले आहेत. पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. त्यातच आता वृद्धेने सर्व संपत्ती राहुल गांधींना दिली आहे.

राहुल गांधी यांचा विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यामुळे सर्व संपत्ती राहुल यांना दान करत आहे, असं वृद्धेचं म्हणणं आहे. काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा यांनी यासंदर्भात काही माहिती दिली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांच्याकडे महिलेने मृत्युपत्र आणि कागदपत्र सुपुर्त केले आहेत, असं लालचंद शर्मा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत राहुल गांधी यांच्या कुटूंबाने नेहमीच देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. इंदिरा गांधी (Indira Gandhi) असोत किंवा राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, असं सर्व संपत्ती दान करणाऱ्या पुष्पा मुंजियाल यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगाची चिंता वाढवली, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

“संजय राऊत जो शब्द वापरतात तो शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल”

“महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची चिंता जास्त”

प्रवीण दरेकरांची पोलिसांकडून तीन तास चौकशी, बाहेर येताच दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल

“मनसे बिनबुडाची झालीये, तिला बुडही नाही आणि शेंडाही नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More