बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

50 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावरुन भारतात परतणार 82 वर्षांच्या चौकीदाराची प्रेयसी

जयपूर | राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील एका गावाची ‘झपाटलेलं गाव’ अशी ओळख आहे. मात्र याच झपाटलेल्या गावात एक अनोखी प्रेम कहाणी तब्बल 50 वर्षांनंतर पुर्ण होणार आहे. या प्रेम कहाणी मधील नायक हा आता 82 वर्षांचा चौकीदार असून तो राजस्थानमधील जैसलमेर येथील कुलढाराचा रहिवासी आहे तर नायिका ही मूळची ऑस्ट्रेलियाची आहे.

1970 च्या दशकास या प्रेमकहाणीची नायिका ऑास्ट्रेलियावरुन जैसलमेरला 5 दिवसांच्या ट्रीपसाठी आली होती. तिचं नाव मरीना असं आहे. मरीना जोव्हा जैसलमेरला आली होती तेव्हा नायकाने तिला उंटाची सवारी शिकवली होती. यादरम्यान त्या दोघांनाही पहिल्याच भेटीत प्रेम झालं. 5 दिवसांच्या ट्रीपनंतर मरीनाने आपल्या प्रेम भावना व्यक्त केल्या आणि ती ऑस्ट्रेलियाला रवाना झाली.

मरीना ऑस्ट्रेलियाला परतल्यानंतर दोघांचा संपर्क पत्राद्वारे चालू राहीला. यादरम्यान मरीनाने त्याला ऑस्ट्रेलियाला बोलावले. 30,000 रुपयांचं लोन काढून घरी माहिती न देताच नायकाने मेलबर्नला उड्डाण घेतली. तिथं तो 3 महिना राहिला. त्यानंतर मरीनाने त्याला लग्न करुन ऑस्ट्रेलियामध्ये सेट होण्यास सांगितले. मात्र तो भारत सोडण्यास तयार नसल्याने ते वेगळे झाले. घराच्या दबावत येऊन नायकाने लग्न केले असून 2 वर्षांपुर्वी त्याच्या पत्नीचं निधन झालं.

दरम्यान, मरीनाने 50 वर्षांनंतर नायकाला पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये ती लवकरच भारतात येत असल्याचं तिने या पत्रात लिहलं आहे. तसेच मरीनाने अजून लग्न केलं नसल्याचं देखील तिने या पत्रात म्हटलं आहे. या संपुर्ण प्रेमकथेला ‘ह्यूमन्स ऑफ बाॅम्बे’ या फेसबुक पेजवरुन वाचा फोडण्यात आली. तसेच ही संपुर्ण माहिती या प्रेमकहाणीतील नायकाने दिलेली आहे.

थोडक्यात बातम्या-

AIIMS प्रमुखांचा देश पातळीवरील लाॅकडाऊनबाबत सरकारला महत्वाचा सल्ला

‘या’ कारणाने नवऱ्यानेच तिचा अश्लिल व्हिडीओ काढुन केला सोशल मिडियावर व्हायरल

मुख्यमंत्र्यांच्या नियमांना शिवसैनिकाकडुनच केराची टोपली; झाली ‘ही’ कारवाई

चिंता वाढली! महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट; काल दिवसभरात आढळले इतके रूग्ण

कामगाराला कोरोना झाल्यास…; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारचा ‘हा’ नवा नियम

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More