बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वयाच्या 92व्या वर्षी ‘या’ ज्येष्ठ शेतकरी नेत्याने केली कोरोनावर मात

कोल्हापूर | देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने काहूर माजलं आहे. वाढती रुग्णसंख्या आणि अपुरी आरोग्य व्यवस्था हे भयावह चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. या लाटेदरम्यान मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेकांना आपल्या जिवाला मुकावं लागलं.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन.डी पाटील यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पण वयाच्या 92 व्या वर्षी देखील पाटील यांनी कोरोनावर मात केली आहे. एन.डी पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पाटील यांना कोरोना झाला असताना त्यांच्या पत्नीने त्यांना मोठा धीर दिला.

एन डी पाटील यांच्या कुटुंबातील सर्वांच्या चाचण्या करण्यात आल्या पण कोणालाही कोरोनाची लागण झाली नव्हती पण पाटील यांची विशेष काळजी घेऊन देखील त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांची चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

रविवारी शेतकरी नेते एन.डी पाटील हे कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत चांगली असून त्यांचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणं गरजेचं असतं. हे एन.डी पाटील यांनी 92 व्या वर्षी कोरोनावर मात करून दाखवून दिलं आहे. एन.डी पाटील हे शेतकरी आणि कामगारांसाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जातात.

थोडक्यात बातम्या

कोरोना उपचारात आता प्लाझ्मा थेरपी नाही; ICMR आणि AIIMSचा मोठा निर्णय

आता तुम्हाला नेटवर्क प्रॅाब्लेम येणार नाही, जिओनं उचललं सर्वात मोठं पाऊल!

लॉकडाऊनमध्ये घरातच पोल डान्स करायला गेली महिला अन्…; पाहा हास्यास्पद व्हिडिओ

आता 15 मिनिटात कोरोना रिपोर्ट; ‘या’ कंपनीनं तयार केली 100 रूपयांची कोरोना चाचणी किट

पुण्याच्या विभागीय आयुक्तांना दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण; मागच्या आठवड्यातच घेतली होती लस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More