Top News पुणे महाराष्ट्र

शिक्षणसंस्था अशी पाहिजे की सुरवंटाचेही फुलपाखरू झाले पाहिजे; गिरीश प्रभुणे

पुणे | मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयात आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पद्मश्री पुरस्कारने सन्मानित गिरीश प्रभुणे, पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, कॉलेजचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार आदी मान्यवर उपस्थित होते. मंचक इप्पर यांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडून सांगितला. ते म्हणाले,”सजीव त्यांच्या संभाव्य क्षमतेपर्यंत विकसित होऊ शकतात. पण मनुष्य आपल्या संभाव्य क्षमतेपर्यंत पोहोचत नाही. यामुळे सर्वांनी योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला पाहिजे.” त्यानंतर डॉ. देविदास गोल्हार यांनी वार्षिक शैक्षणिक अहवाल सादर केला. या वर्षीपासून महाविद्यालयाने दिवंगत ‘डॉ. प्र. चिं. शेजवलकर स्मृती शैक्षणिक गुणवत्ता पारितोषिक’ देण्यास सुरवात केली. महाविद्यालयाकडून गिरीश प्रभुणे यांच्या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्’ या संस्थेला ५१,००० रुपयांचा धनादेश देण्यात आला.

भाऊसाहेब जाधव म्हणाले,”प्रभुणे सरांची पुस्तके वाचताना अपरिचित जग समोर येते. त्यांना खूप दिवसांपासून ऐकण्याची इच्छा होती, आज ती पूर्ण झाली.” यानंतर गिरिश प्रभुणे यांनी सामाजिक कार्यातील काही घटना विस्तृतपणे सांगितल्या. ते म्हणाले,”१०० वर्षांची परंपरा असलेल्यांमध्ये या संस्थेचे एक रोपटं लावलं. आतापर्यंत ज्यांना विविध पुरस्कार मिळालेत त्यांनी भारतमातेच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न केले आहे. प्रत्येकाने ज्ञान स्वतःपुरते न ठेवता ते समाजकल्याणासाठी वापरले पाहिजे.

“मराठवाडा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी उदय आव्हाड युपीएससी परीक्षेत देशात ११ वा आला. या घवघवीत यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कनिष्ठ विभागातील प्रांजली नागुरकर आणि वरिष्ठ विभागातील श्रुती मडनल यांना ‘डॉ. प्र. चिं. शेजवलकर स्मृती शैक्षणिक गुणवत्ता पारितोषिक’ प्रदान करण्यात आला. तसेच २०१९ मध्ये झालेल्या खेलो इंडिया युथ गेममध्ये जलतरण विभागात सर्वात जास्त सुवर्णपदक जिंकलेल्या साध्वी धुरी हिचा ही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा आणि सहा विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात गिरीश प्रभुणे आणि आयपीएस अधिकारी मंचक इप्पर यांचा विशेष सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुजाता शेणई आणि सुपर्णा दास यांनी केले तसेच स्वाती बर्वे यांनी आभार मानले.

थोडक्यात बातम्या-

“संजय राठोड वनमंत्री आहेत, ते दाट वनात संशोधन करत असतील”

‘या’ देशात फेसबुकने बातम्या वाचण्यावर घातली बंदी!

पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

‘गाडी मेरी टू सीटर, उसमे लगा है एक मीटर’; ढिंचॅक पूजाचं नवीन गाणं रिलीझ, पाहा व्हिडीओ

“तुमच्या सोबत बसणारा मंत्री 11 दिवस झाले गायब आहे, त्याला तरी शोधा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या