बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजस्थानमधील अनोखा विवाह! बलात्काराच्या आरोपीने पीडितेशी पोलीस ठाण्यातच बांधली लगीनगाठ

जयपूर | राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात बलात्काराच्या आरोपीने बलात्कार पीडितेशी लगीनगाठ बांधली असल्याची घटना घडली आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आरोपी आणि पीडित या दोघांमध्ये तडजोड झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पीडित महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या मोतीलाल याच्याविरुद्ध भादंवि कलम 376 अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती कोटा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शरद चौधरी यांनी दिली.

संबंधित तरुणीचे आणि मोतीलालचे प्रेमसंबंध होते. मात्र मोतीलालने लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल करुन पोलीस ठाण्यात नेल्यानंतर पोलिसांनी मोतीलाल आणि तरुणीने यांच्यात तडजोड करुन दिली. यानंतर दोघांनी मिळून लग्नाचा निर्णय घेतला.

दरम्यान, मोतीलाल याला रामगंज पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होते. लग्नाच्या निर्णयानंतर उपविभागीय दंडाधिकारी बालकिशन तिवारी यांनी कोरोनामुळे या जोडप्यास लग्न करण्यास परवानगी नाकारली होती. मात्र रामगंज मंडी पोलीस ठाण्याच्या आवारातील मंदिरात हे लग्न पार पडलं. या लग्नाला पीडित मुलीचा भाऊ, आरोपीचे वडील आणि पोलीस उपस्थित होते. तसेच कोरोनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार हा विवाहसोहळा संपन्न झाला.

थोडक्यात बातम्या-

‘या’ रक्तगटातील लोकांना कोरोनाचा धोका अधिक; CSIR च्या संशोधनातून खुलासा

”शिवसेना भवनातून करिना-कतरिनाला फोन केले जातात, पैसे देऊन ट्विट करायला सांगतात”

पत्नीने केली आत्महत्या, माहिती मिळताच पतीने देखील घेतला गळफास

महाराष्ट्रात लाॅकडाऊनमध्ये 1 जूनपर्यत वाढ ‘ही’ आहे नवी नियमावली 

“डोळ्यावरील गुलाबी चश्मा उतरवावा, मोदींना ‘सेंट्रल विस्टा’ शिवाय काहीच दिसत नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More