Saif Ali Khan Update l बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारण अभिनेत्याच्या घरात एका अज्ञात चोराने घुसखोरी करत त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. यामध्ये अभिनेता सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. मात्र आता त्याच्या प्रकृतीबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मात्र या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे.
पोलिसांनी दिली महत्वाची माहिती :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या तब्ब्ल 15 टीम कार्यरत आहेत. तसेच मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सैफच्या इमारतीची देखील तपासणी केली जात आहे. अशातच आता डीसीपी दीक्षित गेडाम यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये पोलिसांनी तीन महत्त्वाच्या अपडेट दिल्या आहेत.
डीसीपी दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तपासासाठी तब्ब्ल 15 वेगवेगळ्या टीम तपास करत आहेत. मात्र यामधील एक आरोपी हा सैफ अली खानच्या घरी गेला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा आरोपी आप्तकालीन परिस्थितीत बाहेर पडण्याच्या मार्गाने त्याच्या घरात पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे, असे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी सांगितलं आहे.
Saif Ali Khan Update l एका आरोपीची ओळख पटली :
दरम्यान, आमच्या आतापर्यंतच्या तपासामध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात ही गंभीर घटना घडली असावी असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र आम्ही या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत, तसेच आरोपीला अटक झाल्यानंतर आम्ही या घटनेची सर्व माहिती तुम्हाला देऊ अशी माहिती डीसीपी दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.
तसेच यामधील एका आरोपीची देखील ओळख पटली आहे. मात्र तो जिन्यांवरुन 12 व्या मजल्यावर गेला अशी माहिती मिळाली आहे. तसेच या आरोपीला अटक करण्यासाठी आमची टीम कार्यरत आहे. यासंदर्भात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे दीक्षित गेडाम यांनी म्हटले आहे.
News Title : The accused who attacked Saif was identified
महत्वाच्या बातम्या-
सैफवरील हल्ला पुर्वनियोजित कट?; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
सैफच्या हल्ल्यानंतर करीना कपूरने दिली पहिली प्रतिक्रिया!
मोठी बातमी! सैफवरील हल्ल्यानंतरचं CCTV फुटेज समोर
डॉक्टरांना सैफच्या शरीरात आढळली धक्कादायक बाब!
सैफसोबत आधी वाद झाला नंतर हल्ला?, अत्यंत खळबळजनक माहिती समोर