बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून प्रसिद्ध अभिनेता विजयने आई-वडिलांवर केले गंभीर आरोप, जाणून घ्या प्रकरण!

नवी दिल्ली | दक्षिण भारतात टाॅलिवूड आणि राजकारण यांचा खूप जवळचा संबंध आहे. दक्षिणेकडील राज्यात अनेक अभिनेत्यांनी सिनेक्षेत्रानंतर राजकीय क्षेत्रात एन्ट्री केली आहे. त्यातच आता टाॅलिवूडच्या आणखी एका अभिनेत्याने राजकारणात प्रवेश केल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर आता टाॅलिवूडमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.

साऊथचा स्टार अभिनेता थालापती विजय याने काही दिवसांपुर्वी राजकीय पक्ष काढणार असल्याची माहिती समोर आली होती. विजयचे वडील एसए चंद्रशेखर यांनी याची माहिती दिली होती. त्यानंतर विजयच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला होता. मात्र, त्यानंतर आता विजयने खळबळजनक आरोप केले आहेत.

विजय याने एक जाहीर निवेदन प्रसारित केलं आहे. त्यात त्याने सांगितलं की, माझ्या वडिलांनी राजकारणात जाण्याचा सल्ला दिला होता. एवढंच नाही तर त्यांनी राजकीय पक्षाची देखील घोषणा केली. तर त्यांनी स्वत: कार्यवाह पदाचा कार्यभार संभाळला. नातेवाईक असलेल्या पद्मनाथन यांना पक्षाचं अध्यक्ष देखील केलं, असा आरोप विजयने केला आहे.

दरम्यान, कोणताही राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी आपण सहमती दिली नसल्याचं विजयने सांगितलं आहे. तसंच त्याने आई वडिलांसह अन्य 11 जणांविरोधात तक्रारही दाखल केली असल्याचं विजयने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

चंद्रकांत पाटील म्हणजे महाराष्ट्राला पटलेलं गोड स्वप्न- रूपाली चाकणकर

किरीट सोमय्यांवरील कारवाई नक्की कोणी केली?, गृहमंत्री म्हणाले…

“बाळासाहेबांचा फोटो काढला तर शिवसेनेची किंमत शुन्यापेक्षाही कमी”

“काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप करायचे असतील तर…”; काँग्रेसचं पाटलांना प्रत्युत्तर!

‘या’ 12 राज्यांनी देशाचं टेंशन वाढवलं; कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More