बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कधीकाळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या ‘या’ अभिनेत्याकडे सध्या घर खर्च भागवण्यासाठीही पैसे नाहीत!

मुंबई | कोरोनामुळे सर्वांनाच मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यातच अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली तर काहींना काम नसल्यामुळे घरीच बसावे लागत आहे. याचा फटका टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अनेकांना बसल्याचं समोर आलं आहे.

एकेकाळी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या चेतन हंसराज या नामांकित टीव्ही अभिनेत्यावर कोरोनामुळे अत्यंत बिकट परिस्थिती आली आहे. सध्या कोरोनामुळे अनेक जण बेरोजगार होत आहेत व शूटिंग बंद असल्याने हंसराज हा देखील बेरोजगार झाला आहे.

दरम्यान, न्यूज ट्रॅकला दिलेल्या एका मुलाखतीत हंसराजने आपल्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत म्हटलं की, इतर कलाकारांप्रमाणेच मी घरात बसलो आहे आणि माझ्याकडे सध्या काहीही काम नाही. तसेच यापूर्वी केलेल्या कामाचा मोबदला देखील अद्याप मिळालेला नाही, त्यामुळेच माझ्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा बोजा वाढत आहे.

चेतन हंसराजने 2000 च्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात टीव्ही मालिकेत काम केलं आणि सर्वाधिक मानधन देखील मिळवलं. आज त्याचा वाढदिवस असून मित्रांना पार्टी देण्यासाठी देखील चेतन हंसराज याच्याकडे पैसे शिल्लक नाहीत, शिवाय घर खर्चासाठीही तुटपुंजी रक्कम हातात असल्याचं त्याने आपल्या मुलाखतीत बोलून दाखवलं आहे. लवकरच ही परिस्थिती जाऊन जुने दिवस परत येतील, अशी आशा चेतन हंसराजने व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या

मोठा निर्णय! एसईबीसी प्रवर्गातील जागा आता खुल्या प्रवर्गातून भरणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार असलेला डेल्टा व्हेरीएंट आता डेल्टा प्लसमध्ये बदलला, भारताला धोका किती?

विजय वडेट्टीवार मुख्यमंत्र्यांवर नाराज? भर पत्रकार परिषदेत व्यक्त केली नाराजी

“जनता भाजपला कंटाळली असून आता काँग्रेस हाच भाजपला एकमेव पर्याय”

महाराष्ट्रातील कोणत्या महापालिका सध्या अनलॉकच्या कोणत्या स्तरामध्ये आहेत, जाणून घ्या एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More