बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पवित्र रिश्ता-2’ मध्ये सुशांतच्या जागी दिसणार ‘हा’ अभिनेता

मुंबई | प्रसिद्ध मालिका ‘पवित्र रिश्ता’ चा भाग 2 येणार असल्याची घोषणा काही दिवसांपुर्वीच करण्यात आली आहे. या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत या दोघांनी प्रमुख भूमिका साकारली होती. मात्र गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली असून आता भाग 2 मध्ये शाहीर शेख हा सुशांतच्या जागी दिसणार आहे.

‘पवित्र रिश्ता’ ही मालिका एकेकाळी प्रचंड गाजली होती. या मालिकेदरम्यान सुशांत बाॅलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेता बनला. मात्र अशातच गेल्या वर्षी त्याने आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येने सर्वत्र खळबळ उडवली असून अजूनही आत्महत्येचं रहस्य कायम आहे. आता ‘पवित्र रिश्ता 2’ लवकरच येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

अर्चना आणि मानव हे पात्र प्रेक्षकांनी अतिशय डोक्यावर उचललं होतं. मात्र मानव आता हयात नसल्यामुळे त्याच्या जागी अभिनेता शाहीर शेख त्याची भूमिका साकारणार आहे. या आधी शाहीर शेख ‘सलिम अनारकली’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या सुपरहीट मालिकांमध्ये तो झळकला होता.

दरम्यान, शाहीर शेख हा मानवची भूमिका साकारणार असला तरी सुशांतची जागा कोणीच घेऊ शकणार नाही, असंही अनेकांनी म्हटलं आहे. याशिवाय मानवच्या पात्रात फक्त सुशांतलाच पाहायचं असल्याचंही म्हटलं आहे. एकता कपूर यांची बालाजी टेलिफिम्स या मालिकेची निर्मीती करणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shaheer Sheikh (@shaheernsheikh)

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून मुस्लिम समाजातील लोक कोरोना लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत”

एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मराठी अभिनेत्याला अटक

“राममंदिर ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, आम्हीही राममंदिरासाठी विटा दिल्या आहेत”

तब्बल वर्षभरानंतर कोरोनाचं हाॅटस्पाॅट बनलेल्या ‘या’ जिल्ह्यात सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार का?, विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More