बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘घर नसल्यामुळे पार्कमध्ये झोपायचे’, उर्फीने सांगितली तिच्या संघर्षाची कथा

मुंबई | संघर्ष (struggle) कोणालाच चुकला नाही. तो आयुष्यात प्रत्येकाला करावा लागतो. त्याशिवाय यश प्राप्त होईल असं सांगणं कठीण असतं. प्रत्येकाचा संघर्ष हा दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो. अनेकदा आपण अनेकांच्या संघर्षाच्या कथा ऐकत असतो. असंच आता एका अभिनेत्रीने तिची संघर्ष कहाणी माडंली आहे.

बिग बॉस ओटीटीमुळे प्रसिद्धीत आलेली उर्फी जावेद सगळ्यानांचं माहित आहे. उर्फी सोशल मीडियाव देखील नेहमी चर्चेत असते. उर्फी इंटरनेटची सेन्सेशन (Sensation) बनली आहे. ती तिच्या बोल्ड अंदाज आणि अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते. अनेकदा तिच्या विचित्र ड्रेस प्रकारामुळे तिला ट्रोल केलं जातं. आता जरी ती एकदम बोलकी आणि बोल्ड दिसत असली तरी एकेकाळी हीच उर्फी डिप्रेशनची शिकार बनली होती

तिने तिच्या स्ट्रगलिंग डेज बद्दल तिच्या एका पोस्टमध्ये लिहिलं आहे. माझं आयुष्य बरबाद झालं होतं. माझं करियर, रिलेशनशिप (relationship) त्यावेळी संपलं होतं. मी किती लुजर आहे हे मला लोक सारखं दाखवून द्यायचे. एकेकाळी घर नसल्यामुळे उर्फीला पार्कमध्ये झोपायला लागायचं. थंडीत कुडकुडत ती रात्र काढायची. ती त्यावेळी खूप निराश झाली होती. ती आत्महत्या करणार होती, असंही तिने सांगितलं आहे.

कास्टिंग काऊच (Casting couch) सारख्या गोष्टी आपल्यासोबतही झाल्याचं ती मान्य करते. यामुळे तिला सगळी इंडस्ट्री बाद आहे असं म्हणायचं नाही. ती सुदैवाने त्यात फसली नाही याचं तिला समाधान असल्याचं ती म्हणाली.

थोडक्यात बातम्या

येत्या तीन महिन्यात मध्यावधी निवडणुका लागणार?, रोहित पवारांच्या वक्तव्याने खळबळ

सध्याच्या राजकारणावर नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

शिवसेना फोडल्याचं श्रेय फडणवीसांनी घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंनाच – राज ठाकरे

“दोन मंत्र्यांचं सरकार कोसळणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार”

“संजय राऊत बेरोजगार आणि उद्धव ठाकरे घरीच बसून असतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More