काय सांगता! भर सोहळ्यात अभिनेत्रीनं काढले रक्ताळलेले कपडे अन्….
पॅरिस | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. फक्त भारतातच नव्हे तर संपुर्ण जगातला या कोरोनाचा फटका बसला होता. अनेक कार्यक्रम आणि थेटर शो देखील रद्द करावे लागले होते. कलाकारांना मोठमोठी कामे रद्द करावी लागली होती. देशातील थेटर पुन्हा चालू करावे यासाठी हाॅलिवूडच्या कोरिन मासेरियो या अभिनेत्रीने चक्क भर पुरस्कार सोहळ्यात पुर्ण कपडे काढून सरकारचा निषेध केला आहे.
फ्रेंच ऑस्कर पुरस्कार सोहळा शुक्रवारी फ्रांसच्या पाॅरिसमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात कोरिन मासेरियो ही अभिनेत्री स्टेजवर पोहचली. तिनं गाढवासारखा पोषाख घातला होता. तिच्या कपड्यावर रक्त लागले होते. समोर बसलेल्या लोकांना काही समण्याआधी आधी तिनं अंगावरचे पुर्ण कपडे काढले आणि पुर्णपणे नग्न झाली. या माध्यामातून तिनं सरकारचा निषेध नोंदवला आहे.
तिनं कपडे काढले तेव्हा तिच्या पाठीवर ‘नो क्लचर, नो फ्युचर’ असा संदेश लिहला होता. तिला या कार्यक्रमात बेस्ट काॅस्ट्युम अवाॅर्ड देण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. सरकारने कोरोनाच्या काळात संस्कृती आणि कलेशी संबंधीत लोकांना मदत करायला हवी. लोक संकंटात असून त्यांना मदत करणे गरजेचे आहे, असं मासेरियो त्यावेळी कार्यक्रम सोहळ्यात म्हणाली.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर फ्रांसमध्ये गेली 3 महिने चित्रपटगृह बंद आहेत. डिसेंबरमध्ये शेकडोंच्या संख्येनं कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार तसेच सिनेक्षेत्राशी निगडीत लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. तरी देखील सरकारने यासंबंधी कोणताही निर्णय घेतला नव्हता. तिच्या या कारनाम्याची चर्चा संपुर्ण हाॅलिवूडमध्ये चालू आहे.
थोडक्यात बातम्या-
सचिन वाझेंना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला- संजय राऊत
‘हा’ आयपीओ बाजारात बुधवारी धडकणार; गुंणतवणुकदांरांंना मोठी संधी
“लाॅकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही”
इशान किशनचं धूमधडाक्यात पदार्पण, भारताचा इंग्लंडवर दमदार विजय
Comments are closed.