बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा केली ‘इतकी’ वर्ष; एमपीएससीबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई |  कोरोना महामारीमुळे एमपीएससीच्या परीक्षा लांबल्या त्यासोबतच परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अनेकांना नोकरी मिळाली नाही. अशातच पुण्यातील स्वप्नील लोणकरने परीक्षेत पास होऊन नोकरी न मिळाल्याने आत्महत्या केली आहे. यावरून आजच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर टीका केली.

सरकारनेही या मुद्द्याचा विचार करत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा 43 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मंत्री अशोक चव्हाण यांनी घोषणा केली.

एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा 43 पर्यंत वाढवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने यासाठी मान्यता दिली असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. त्यासोबतच एमपीएससीची सर्व रिक्त जागा भरण्याबाबतही सरकारने मोठी घोषणा केली आहे.

दरम्यान,सरकार 31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या संपूर्ण रिक्त जागा भरेल. यात कोणताही अडथळा येणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

-थोडक्यात बातम्या- 

‘आमदारकी गेली तरी चालेल पण…’; निलंबित आमदार आमदार राम सातपुतेंचा सरकारवर घणाघात

“शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रुपाने नवे तालिबानी महाराष्ट्रावर राज्य करू पाहत आहे”

“उज्ज्वला गॅस योजनेसाठी इम्पेरीकल डाटा वापरता मग ओबीसींसाठी का दिला जात नाही”

“भाजप-शिवसेनेचं नातं आमीर खान आणि किरण राव यांच्यासारखं”

“31 जूलैपर्यंत एमपीएससीच्या रिक्त जागांबाबत केलेली घोषणा फसवी आहे”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More