बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्षे होणार’, केंद्र सरकारच्या हालचालींना वेग

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार (Central Government) मुलींच्या विवाहाचं वय वाढवणार अशा चर्चा सुरू होत्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात याविषयीचे संकेत दिले होते. सद्यस्थितीत मुलींच्या लग्नासाठी 18 वर्षे वयाची अट आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आणि पुरूषांच्या लग्नाच्या वयामध्ये समानता आणण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. (Union Cabinet clears proposal to increase age of marriage for women to 21 years)

या हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 (Child Marriage Act) मध्ये सुधारणा करण्याकरिता केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत. मुलीच्या लग्नाच किमान वय 18 वरून  21 होण्याची शक्यता आहे. तसेच देशातील विविध समुहांच्या विवाहाशी संबंधित वैयक्तिक कायद्यांमध्ये मोठे बदल करण्याची मागणी होण्याची देखील शक्यता आहे.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दुरूस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे. मुलीचं लग्नाचं वय 18 वरून वाढवण्याकरिता  टास्क फोर्स स्थापन करण्यात आलं होतं. आता टास्क फोर्सने अहवालामध्ये मुलीचं वय 18 वरून 21 वर्षे करण्याची शिफारस केली आहे.

दरम्यान, समता पक्षाच्या माजी प्रमुख आणि टास्क फोर्सच्या अध्यक्षा जया जेटली यांनी म्हटलं आहे की, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुरूष समानता आणि सशक्तीकरणावर चर्चा करतो. मग आपण लग्नाचा मुद्दा मागे सोडू शकत नाही, कारण तो भेदभावाचा मुद्दा असू शकतो. आम्ही बऱ्याच लोकांशी सल्लामसलत केली, आम्ही विद्यापीठे, ग्रामीण भागातील तरूणांना मदत केली. जिथं अजुनही शिकत आहे किंवा शिक्षण पुर्ण केलं आहे. लग्नाचे वय 22 किंवा 23 असावे असं त्यांनी एकमताने सांगितलं आहे. लग्नाचे वय वाढवावे असं सर्व धर्मांच्या सदस्यांचे मत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

ओमिक्राॅनबाबत तज्ज्ञांचा गंभीर इशारा; ‘या’ महिन्यात रूग्ण झपाट्याने वाढणार

ठोंबरेंच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवार म्हणतात, ‘रुपालीताई डॅशिंग नेत्या, मात्र…’

विरूष्काला मोठा धक्का! विराट कोहलीपाठोपाठ आता अनुष्कालाही डच्चू

करण जोहरच्या पार्टीत ठाकरे सरकारचे मंत्री?; अशिष शेलार म्हणतात, ‘CCTV फुटेज तपासा’

गुगलचा कर्मचाऱ्यांना झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More