बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून आता रिकाम्या हाताने परत जाऊ नये’; ‘या’ राज्यपालांचं मोठं वक्तव्य!

लखनऊ | मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं आहे. देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि बिकट झाली आहे. तसेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजून न घेता कृषी कायदे अस्तित्वात आणले असं त्यांनी बोलून दाखवलं आहे. उत्तर-प्रदेशातील बागपत या आपल्या मूळगावी एका कार्यक्रमात आले असताना सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारवर आपली तोफ डागली.

दिल्लीतील शेतकऱ्यांनी दिल्लीतून आता रिकाम्या हाताने परत जाऊ नये असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून आपण शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका अशी विनंती केली असल्याचंही ते बोलले.

शेतकरी नाराज झाल्यास देश फारकाळ तग धरू शकत नाही, तसेच हा मुद्दा चर्चेतून सोडवला गेला पाहिजे आणि त्यासाठी मला जे काही करावे लागेल ते मी करेन, असं मलिक यांनी बागपतच्या एका कार्यक्रमात बोलून दाखवलं. देशातील 5 राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

सत्यपाल मलिक यांची मागच्या दोन वर्षांमध्ये तीन वेळा बदली करण्यात आली आहे. सप्टेंबर 2017 ला बिहारचे राज्यपाल असलेले मल्लिक यांची आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच ऑगस्ट 2018 ला जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्यानंतर, ऑक्टोबर 2019 मध्ये ते गोव्याचे राज्यपाल म्हणून रुजू झाले तिथूनही त्यांची बदली करून त्यांना आता मेघालयच्या राज्यपालपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या

डान्स करताना उर्वशी रौतेलासोबत नको ते घडलं, पाहा व्हिडीओ

ओए चारो तरफ घुम के बॅट दिखा; जेव्हा विराट इशान किशनकडे बघून ओरडतो, पाहा व्हिडीओ

औरंगाबाद जिल्ह्यातील तपासणी दौऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लागु केले ‘हे’ नवे निर्बंध

…अन् भररस्त्यात शंभुराज देसाई यांनी उदयनराजेंना केला मुजरा

नवऱ्यानं कापलं बायकोचं ओठ आणि नाक; कारण ऐकून पोलीसही हादरले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More