बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एअर होस्टेसच्या पुस्तकानं जगभरात खळबळ, सांगितले अब्जाधीशांचे चाळे!

नवी दिल्ली | एका माजी एअरहोस्टेसने तिच्या एका पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सास्किया स्वान असं या माजी एअरहोस्टेसचं नाव आहे. तिने ‘सीक्रेट ऑफ ए प्रायव्हेट फ्लाइट अटेंडंट’ या पुस्तकात अब्जाधीशांचे विमानातले चाळे सांगत खळबळ उडवून दिली आहे.

हा जॉब मिळवण्यासाठी आठ गुप्त करारांवर स्वाक्षरी करावी लागली होती. एक्केचाळीस लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर एका अब्जाधीशाची नोकरी मिळाली. पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय होती. मला वाटलं की संपूर्ण आयुष्य बदललं आहे. मात्र या नोकरीची आणखी एक बाजू होती, असं सास्कियाने सांगितलं.

जेव्हा अब्जाधीश तिच्या पत्नीला लॉस एंजेलिसमध्ये घेऊन गेला तेव्हा तीसुद्धा त्याच्याबरोबर होती. त्याने आपल्या बायकोला सोडल्यानंतर सास्कियाला सांगितले की तात्काळ त्याच्या पत्नीचे सर्व पुरावे मिटवून टाक, ज्यात तिचा कंगवा, पिशवी, शूज इ. वस्तू होत्या. जर त्याच्या मैत्रिणीस दुसरी गर्लफ्रेंड असल्याची माहिती मिळाली तर तुझी नोकरी जाईल, अशी धमकी त्या अब्जाधीशाने सास्कीयाला दिली होती.

सास्कीयाने आपल्या पुस्तकात लिहलंय की तिला नंतर कळले की अब्जाधीश तिच्याकडून फ्लाइट अटेंडंटपेक्षा वेगळी अपेक्षा करत होता. न्यूयॉर्कच्या प्रवासादरम्यान अब्जाधीशांसोबत शारीरिक संबंध न ठेवल्यास तिला नोकरीवरून काढून टाकलं जाईल अशी धमकी दिल्याचं तिने सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

जीवाची पर्वा न करता सर्वेक्षण करणाऱ्या आशा सेविकेचा कोरोनाने मृत्यू, केंद्राकडून 50 लाखांची मदत

पऱ्यांनी अंगावर पाणी शिंपडलं की कोरोना होणार नाही, अशी अफवा पसरवणारे अटकेत

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

कोरोनामुळं कुटुंब उद्ध्वस्त; आजी-आजोबा, वडिलांनंतर उच्चशिक्षित मुलाचा मृत्यू

महाराष्ट्रभर गोंधळ उडवून मंत्री विजय वडेट्टीवार नागपुरात!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More