बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समीर वानखेडेंना कोर्टाचा मोठा झटका, दिला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | मागील एका महिन्यापासून राज्यात एनसीबीच्या (NCB) कारवाईवरून जोरदार रंगकंदन पेटलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं आहे. अशातच आता एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या परिवाराच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं समीर वानखेडे यांच्या परिवाराला मोठा धक्का दिला आहे.

नवाब मलिक दररोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत होते. समीर वानखेडे यांनी अनेक चुकीचे प्रकार आणि गुन्हे केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे हे जन्मानं दलित नसून मुस्लीम असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. यावर समीर वानखेडे यांच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं मलिक यांच्या बोलण्याला सध्यातरी खोटं ठरवलं जाणार नाही, असं म्हटलं आहे. मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत हे यावेळी सांगता येणार नाही, असं सांगत न्यायालयानं मलिक यांना बोलण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. मलिक यांनी बोलण्यापूर्वी फक्त त्या गोष्टींची शहानिशा करावी, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, 2 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या एका क्रुझवर एनसीबीच्या कारवाईपासून या प्रकरणाची सुरूवात झाली होती. सध्या या प्रकरणाला न्यायालयाच्या या टिपण्णीनंतर वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांनी लागलीच ट्विट करत सत्यमेव जयते, असं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या 

अरे काय हे!… उद्घाटन होताच अजित पवारांनी डोक्याला हात लावला

गुटखा तस्करीत सापडला शिवसेना जिल्हाप्रमुख, शिवसेनेनं उचललं मोठं पाऊल

शरद पवार-अनिल परब बैठकीत नेमकं काय झालं; आली ‘ही’ माहिती समोर

“भरतासारख्या भावावर फक्त रामच प्रेम करू शकतात, आपण ते करू शकत नाही”

पार्थ पवार पुन्हा मावळातून निवडणूक लढवणार का?; ट्विटमुळे चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More