ब्राझिलिया | जगप्रसिद्ध फुटबॉलपटू नेमार ज्युनिअरवर दारूच्या नशेत एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेमारविरोधात ब्राझील पोलिसांत पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे.
संबंधित महिलेने बलात्काराबरोबर मारहाण केल्याचा आरोप देखील नेमारवर केला आहे. या प्रकरणामुळे स्टार फुटबॉलपटू नेमार मोठ्या अडचणीत सापडला आहे.
आरोप करणारी महिलाही ब्राझीलची असून तिची आणि नेमारची ओळख सोशल मीडियावर झाली होती. यानंतर त्या दोघांची भेट एका हॉटेलमध्ये झाली.
दरम्यान, महिलेने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सांगत नेमार आणि त्याच्या वडिलांनी आरोप फेटाळले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-जमाव हत्येच्या नावाने मुस्लीमांच्या हत्या होतात- सपा खासदार
-नितीश कुमार यांचं मोदी आणि भाजपला जशास तसं प्रत्युत्तर!
-मोदी-राहुल गांधींच्या नावानं विनोद करणं पडलं महागात; खेळणी विक्रेत्याला अटक
-‘या’ अभिनेत्रीला मोदींसोबत डिनर करायचं आहे…!
-सलमान म्हणतो, ‘हा अभिनेता पुढील काळात सर्वात मोठा सुपरस्टार असेल’
Comments are closed.