बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दहशतवादी झाले मंत्री-संंत्री! तालिबानच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा

काबूल | तालिबानसोबत झालेल्या शांतता करारानुसार अमेरिकेने आता अफगाणिस्तानातून आपलं सैन्य मागं घेतलं आहे. मात्र तालिबानने शांतता करार मोडत अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवलं. त्यानंतर आता तालिबानने अफगाणिस्तानात आपलं नव्या सरकारची घोषणा केली आहे. तर त्यांच्या नव्या मंत्रीमंडळाची देखील माहिती समोर येत आहे.

मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हे अफगाणिस्तानमधील तालिबानचे नवे पंतप्रधान असणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरला या नव्या सरकार स्थापनेची औपचारिक घोषणा होऊ शकते. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या मुल्ला बरादर यांना उपपंतप्रधान पद देण्यात येणार आहे. तर सिराजुद्दीन हक्कानी यांना कार्यकारी गृहमंत्री पद देणार आहेत.

मुल्ला याबूक यांना संरक्षणमंत्री तर, अमिर मुत्तकी यांना परराष्ट्रमंत्री केलं जाईल. खैरउल्लाह खैरव्वा यांच्याकडे माहिती मंत्रालय देण्यात येणार आहे. अब्दुल हकिम यांच्याकडे न्यायमंत्री पदाची दबाबदारी देण्यात आली आहे. तर शेर अब्बास यांना उपपरराष्ट्रमंत्री करण्यात आलं आहे.

दरम्यान, जागतिक स्तरावर प्रसारमाध्यमांना अफगाणिस्तानमधील माहिती पोहचवण्यासाठी जबीउल्लाह मुजाउद्दीन हा नेता अधिकृत प्रवक्ता म्हणून काम पाहणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे फेरीवाला नाही यामागे…’; कल्पिता पिंगळेंचा मोठा गौप्यस्फोट

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

‘…बाप बाप होता है!’; नितेश राणेंचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

तालिबान्यांनी अफगाण सैन्याला दिलेल्या ‘या’ ऑफरने पाकिस्तान, चीन धास्तावले!

पाकिस्तानच्या मदतीने तालिबानने केली, ‘या’ नेत्याची पंतप्रधानपदी निवड, जाणून घ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More