बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना कधी संपणार?; WHO नं दिलेल्या उत्तरानं जगाचं टेंशन वाढवलं

नवी दिल्ली | कोरोनामुळे मानवी जीवनावर भयंकर वाईट परिणाम झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेणारा हा विषाणू आजही जगात आहे. भारतासह सर्वच देशांना आतापर्यंत कोरोना विषाणूची पहिली आणि दुसरी लाट सहन करावी लागली आहे. यामुळे कोरोना कधी संपणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर WHO नं दिलं आहे.

कोरोनाला अजून महामारीच्या श्रेणीतच ठेवलं जाईल, कारण हा विषाणू लगेचच जाणार नाही. संघटनेच्या या विधानातून हे स्पष्ट होतं की जगाला अजूनही प्रसार रोखण्यासाठी निर्बंध पाळणं गरजेचं आहे. कारण कोरोनाचे नवे व्हेरिएंट काळजी वाढवत आहेत, असं WHO नं म्हटलं आहे.

लोकांना लस दिली जाईल तेव्हा लोकांची इन्युनिटी वाढेल आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आपोआप कमी होईल. या स्थितीत पोहोचल्यानंतर कोरोनाला महामारीच्या श्रेणीतून हटवलं जाईल, असंही WHO नं म्हटलं आहे.

दरम्यान, भारतातील कोरोनाच्या स्थितीचे कारण त्याची व्याप्ती आणि देशाच्या विविध भागातील लोकांची रोगप्रतिकारक शक्ती आहे. एवढेच नाही तर भविष्यात कोरोनाची प्रकरणे अशीच कमी होत व वाढत राहू शकतात, असं WHO च्या अधिकाऱ्यानं म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

किरीट सोमय्या यांना न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणात न्यायालयात हजर राहावं लागणार

“72 तासात माफी मागा अन्यथा, 100 कोटींचा दावा ठोकणार”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More