बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना संकटातून वाचण्यासाठी पुणे प्रशासनानं लष्कराकडे केली ‘ही’ मागणी!

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेषत: पुण्यामध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. पुणे शहरासह जिल्ह्याची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे. यामुळे पुणे प्रशासन आता भारतीय लष्कराची मदत घेणार असल्याचं कळतंय.

रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे पुण्यात रूग्णांना बेड मिळत नाहीयेत. तसेच व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड्सची कमतरता जाणवत आहे. यामुळे पुण्यातील लष्कराचं रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी पुणे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे बेडची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णालयाने तीन हॉटेल्स भाड्याने घेतल्या असून या ठिकाणी 180 बेड्स उलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती पुण्याच्या रुबी रुग्णालयाने दिली आहे.

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 2 लाख 83 जार 819 रुग्ण इतकी आहे. यापैकी 2 लाख 38 हजार 890 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात सध्या 39 हजार 518 सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत 5 हजार 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात मंगळवारी दिवसभरात 10 हजार 226 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

थोडक्यात बातम्या- 

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात वर्षा गायकवाड यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अमित शहा काय देशाचे मालक नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा जोरदार टोला

5 वर्ष शिक्षक अल्पवयीन मुलीवर करायचा बलात्कार; निवृत्त झाल्यानंतर तिच्यासोबतच केलं असं काही…

‘कोरोना लसींबाबत माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी बोलावं’; फडणवीसांनी राजेश टोपेंना सुनावलं

मागेल त्याला कोरोनाची लस द्या; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More